Breaking News
Home / बातम्या / यवतमाळच्या रुग्णालयात उपचार झालेली ती पूजा अरुण राठोड कोण? समोर आली नवी माहिती

यवतमाळच्या रुग्णालयात उपचार झालेली ती पूजा अरुण राठोड कोण? समोर आली नवी माहिती

पूजा चव्हाण प्रकरणात मागील काही दिवसांपासून अनके नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती.

पूजा चव्हाणच्या प्रकरणात १२ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या. या रेकॉर्डिंगमधील आवाज हा वनमंत्री संजय राठोड यांचाच आहे, असा दावा भाजपने केला होता. त्यामुळे या प्रकरणाची निष्षक्ष चौकशी व्हावी यासाठी संजय राठोड यांची हकालपट्टी करा अशी मागणीही भाजपने लावून धरली होती.

हे प्रकरण घडल्यानंतर मंत्री संजय राठोड हे अज्ञातवासात गेले आहेत. पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत असून पोलिसांनी पूजाच्या घराची तपासणी केली असता तिच्या घरात म द्याच्या ४ बाटल्या सापडल्या.

त्यातील अडीच बाटल्या रिकाम्या होत्या. त्यावरून घरातील व्यक्तींनी म द्य प्राशन केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, पूजाने म द्य प्रशान केले होते की नाही या बाबतचा अद्याप उलगडा झालेला नाही.

परंतु, म द्याच्या बाटल्या सापडल्याने पूजाचा म द्याच्या न शेत गॅलरीतून तोल तर गेला नाही ना? किंवा तिला न शेत कुणी ढकलून तर दिले नाही ना? असा सं शय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान रेकॉर्डिंग मध्ये पूजावर कुठले तरी उपचार केले जाणार होते हे समजते. हे उपचार नेमके कशाचे होते हे मात्र समजले नव्हते. दरम्यान या प्रकरणातील नावाशी साम्य असलेल्या मुलीवर यवतमाळ मध्ये उपचार झाल्याचे समोर आले आहे.

ती पूजा अरुण राठोड कोण?

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात पूजा अरुण राठोड नावाच्या एका महिलेचा ग र्भ पा त झाल्याचे समोर आले आहे. हि पूजा अरुण राठोड नेमकी कोण असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.

पूजा चव्हाण सोबत राहत असलेल्या तरुणाचे नाव अरुण राठोड असल्याने पूजा चव्हाणचेच नाव पूजा अरुण राठोड असे देण्यात आले होते का असा संशय बळावला आहे. या प्रकरणातील डॉक्टर देखील नॉट रिचेबल आहेत.

पूजा अरूण राठोड ही ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती. तशी नोंद अहवालात आहे. तिचा वॉर्ड क्रमांक ३ होता आणि डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचं रिपोर्टमध्ये दिसतं आहे.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *