Breaking News
Loading...
Home / प्रेरणादायी / हिरॉइन्सचे ऍक्शन सीन करणाऱ्या “या” स्टंट आर्टिस्टवर बनत आहे वेब सिरीज

हिरॉइन्सचे ऍक्शन सीन करणाऱ्या “या” स्टंट आर्टिस्टवर बनत आहे वेब सिरीज

प्रत्येक इंडस्ट्रीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही अशी अनेक कामे आहेत, जी फक्त पुरुषांचीच आहेत असे मानले जाते. महिला अभिनेत्रींना अशा प्रकारच्या अभिनयापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.

परंतु महिलांनी स्वतःच्या हिमतीवर प्रत्येक वेळी समाजातील असले अनेक समज मोडीत काढून दाखवले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेची कहाणी सांगणार आहोत, जिने पुरुषांचे काम समजल्या जाणाऱ्या ऍक्शन स्टंट्सचे काम स्वीकारले आणि त्यात नावही कमावले.

Loading...

कोण आहे ती स्टंट अभिनेत्री ?

बॉलिवूड चित्रपटात ऍक्शन स्टंट्सची कामे करणाऱ्या त्या लढाऊ आणि धाडसी महिलेचे नाव रेश्मा पठाण आहे. रेश्मा ही बॉलिवूडची पहिली स्टंट वूमन आहे. तुम्हाला शोले हा सुपरहिट चित्रपट आठवत असेल. या चित्रपटात हेमा मालिनीने बसंतीची भूमिका साकारली होती.

पडद्यावर अभिनय हेमाने केले होते, पण जितके काही ऍक्शन सीन होते, ते हेमाच्या शरीराच्या जागी रेश्मानेच सादर केले होते. अगदी ते दृश्यही ज्यात बसंती आपला टांगा पळवत असताना म्हणते, “चल धन्नो आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है.” रेश्माने हेमा मालिनी, मीनाक्षी शेषाद्री, डिंपल कपाडिया इत्यादी अनेक अभिनेत्रींनसाठी ऍक्शन सीन केले आहेत.

रेश्माच्या आयुष्यावर बनत आहे वेब सिरीज

रेश्माने वयाच्या १४ व्य वर्षीच स्टंट कलाकार बनण्याचा मार्ग निवडला, तेव्हा तिलाही पुरुष स्टंट आर्टिस्टकडून विरोध झाला होता. शोले चित्रपटाच्या रिलीजनंतर ७० च्या दशकात तिला ओळख मिळाली. शोलेच्या शूटिंगवेळी टांग्याच्या सीनमध्ये तिला गंभीर दुखापत झाली होती, पण तिने सीन पूर्ण केला आणि मगच दवाखान्यात गेली.

गर्भवती असतानाही तिने अनेक स्टंट सीन केले होते. रेश्मा ही मूव्ही स्टंट आर्टिस्ट असोसिएशनचे सदस्यत्व मिळविणारी पहिली स्टंट वुमन आहे. आता तिच्यावर एक बायोपिक तयार केली जात आहे. त्याचे नाव आहे ‘द शोले गर्ल’. ही एक वेब सिरीज ZEE5 वर बघायला मिळेल. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हा बायोपिक प्रदर्शित होईल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *