सध्याच्या घडीला विश्वास नांगरे पाटील हे नाव सगळीकडेच प्रसिद्ध झालेले आहे. नांगरे पाटलांनी ग्रामीण भागातून पुढे येऊन प्रशासकीय सेवेत त्यांचे मोठे नाव केले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत असते. २६/११ दहशतवादी हल्लीच्या वेळेला त्यांनी दहशतवाद्यांचा हल्ला परतवून लावला होता. त्यामुळे त्यांना नंतर पदक देऊन गौरवण्यात आले होते.
त्यांनी त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे परिवर्तन करणारी एखादी कोणती घटना असेल तर ती २५/११ चा हल्ला हा होता. त्यांनी घटना सांगताना म्हटले आहे की, ” मी नेमकेच माझी ड्युटी निभावून घरी आली होतो. पत्नीसोबत जेवण करत होतो तोच मला फोन आला. त्यांना कॉल करणाऱ्या डॉक्टरने लिओपार्ड कॅफे येथे हल्ला करण्यात आला आहे असे सांगितले.
त्यानंतर ते जेव्हा सदर ठिकाणी गेले तेव्हा त्यांना त्या वेळेसचे डीजीपी विश्वास ए एन रॉय त्यांनी नांगरे पाटील यांना ताज हॉटेल येथे जाण्याचा आदेश दिला. जेव्हा त्यांना येथे जाण्याचा आदेश दिला तेव्हा त्यांनी तेथे दहशतवादी हल्ला झाला होता त्या वेळी त्यांनी तिकडे लगेच धाव घेतली. तेव्हा त्या आधी त्यांनी २९ आणि ३० सप्टेंबरला ताज हॉटेलला भेट दिली होती.
त्या वेळी त्यांनी उत्तर बाजूला असणाऱ्या दरवाजाला ग्रील लावण्याचे आदेश दिले होते पण तिथे काचेचा दरवाजा असल्यामुळे दहशतवाद्यांनी तो तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी विश्वास नांगरे यांनी दहशतवाद्यांशी सामना करून कित्येक जीव वाचवले होते. त्यांच्या या धाडसामुळे नंतर त्यांना राष्ट्रपती पदक देण्यात आले होते. त्यामुळे