भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या शानदार खेळामुळे जगात प्रसिद्ध आहे. एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान असणारा विराट हा सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. विराटची वार्षिक कमाई ९०० कोटींच्या घरात आहे. वेगवेगळ्या महागड्या ब्रॅण्डची जाहिरात करुन विराट करोडो रुपये कमावतो.
त्यासोबतच रेस्टोरंट, जिम, फॅशन ब्रँड, स्टार्टअप डिजिट आणि स्टेपाथलॉन किड्स अँड स्पोर्ट्स कॉनव्हो यामध्ये त्याने गुंतवणूक करुन करोडो रुपये कमवत आहे. या श्रीमंती सोबतच विराटला अनेक महागड्या गोष्टींचा देखील शौक आहे. पाहूया विराटचे महागडे शौक…
१) नऊ लाखांचे घड्याळ घड्याळ : विराटला महागड्या घड्याळाचा प्रचंड शौक आहे. नुकत्याच विराटच्या एका इंस्टाग्राम पोस्टमधील फोटोत तो आपल्या हातात Rolex Cosmograph Daytona Rainbow Everose Gold घड्याळ घालून बसलेला दिसून आला. या घड्याळाची किंमत जवळपास ९ लाख रुपये आहे. इतर वैशिष्ट्यांसह हे घड्याळ ६९ लाख रुपये किंमतीचे आहे.
२) साडेतीन कोटींची कार : विराटला आलिशान गाड्यांचीही फार आवड आहे. विराटने नुकतेच आपल्या कार्सच्या ताफ्यात Bentley Flying Spur या कारचा समावेश केला आहे. अद्वितीय मॅट्रिक्स हेडलॅम्प्स, ६.० लिटर आणि डब्ल्यू १२ इंजिनसह प्रेमीजनांसाठी ही कार एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. या कारची किंमत तब्बल ३.४१ कोटी रुपये आहे. याशिवाय विराटकडे १.१० कोटी रुपये किंमतीची Audi RS5 Coupe कार देखील आहे.
३) चौतीस कोटींचे पेंट हाऊस : विराट तसा दिल्लीचा राहणारा, पण अनुष्कासोबत लग्न झाल्यानंतर तो दिल्लीवरुन मुंबईला शिफ्ट झाला. लग्नानंतर विराट आणि अनुष्का यांनी मुंबईच्या वरळीच्या प्रसिद्ध “ओंकार १९७३” या टॉवरमध्ये राहण्यासाठी पेंट हाऊस खरेदी केले असून त्याची किंमत ३४ कोटी रुपये आहे.
४) ऐंशी कोटींचे घर : विराट कोहलीकडे दिल्ली एनसीआरच्या गुरुग्राम भागामध्ये एक शानदार बंगला आहे. विराटच्या या घराची रचना उत्तर भारतातील प्रसिद्ध डिझाईनिंग फर्म Confluence ने केली आहे. विराटच्या या घरची किंमत तब्बल ८० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या बंगल्यात विराटची आई आणि त्याच्या मोठ्या भावाची फॅमिली राहते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.