अटक केल्यानंतरही कमी नाही झाला विकास दुबेचा माज, समोर आला व्हिडीओ..

कानपूर शूटआऊट प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेला अटक करण्यात आली आहे. विकास दुबे हा या प्रकरणानंतर फरार झाला होता. विकास दुबेला आज अटक करण्यात आली आहे. याआधी त्याच्या ३ साथीदारांचं पोलिसांनी ए न्काउंटर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून विकास दुबेचा शोध सुरू होता.
विकास दुबेला आज मध्य प्रदेशमधल्या उज्जैन येथे अटक करण्यात आली आहे. विकास दुबेनं फिल्मी स्टाइल आत्मसमर्पण केलं. उज्जैनच्या महाकाल मंदिर संकुलापर्यंत २५० रुपयांचं तिकीट घेऊन तीन साथीदारांसह विकास दुबे दर्शनाच्या प्रतीक्षेत होता. तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षाकाला संशय आला, त्यानं विकास दुबेची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला पोलिसांकडे सुपूर्त केले.
विकास दुबे उज्जैनच्या तिवारी नावाच्या व्यक्तीशी संपर्कात होता. तिवारीमार्गेच त्यानं उज्जैन गाठले होते. तो अल्पावधीतच उज्जैनमध्ये कसा पोहोचला याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.
दरम्यान त्याला अटक झाल्यानंतरही त्याचा माज कमी झाला नव्हता. संशय आल्यानंतर त्याला ताबडतोब मंदिराच्या आवारात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी पकडले आणि पोलिसांना कळविले. पोलीस घेऊन जाताना पोलिसांसमोरच त्यानं मोठमोठ्यानं ओरडून सांगितलं की, मीच कानपूरवाला विकास दुबे आहे.
बघा व्हिडीओ-
#WATCH Madhya Pradesh: After arrest in Ujjain, Vikas Dubey confesses, "Main Vikas Dubey hoon, Kanpur wala." #KanpurEncounter pic.twitter.com/bIPaqy2r9d
— ANI (@ANI) July 9, 2020
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.