Breaking News
Home / बातम्या / अभिनेता विजय राज याला गोंदिया येथे अटक, बघा काय आहे प्रकरण..

अभिनेता विजय राज याला गोंदिया येथे अटक, बघा काय आहे प्रकरण..

बॉलीवूड मध्ये अभिनेता विजय राज प्रसिद्ध आहे. रन सिनेमातील कौवा बिर्याणी या सीनमुळे प्रत्येक घराघरात विजय राज पोहचले. त्यानंतर अनेक सिनेमामध्ये त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्रातील गोंदिया येथे शुटींग सुरु असताना त्यांना आज अटक करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात विद्या बालन प्रमुख भूमिकेत असलेल्या शेरनी चित्रपटाचे शुटींग सुरु आहे. विजय राज सोबत सिनेमाचा पूर्ण युनिट गोंदियातील गेटवे हॉटेल मध्ये १५ दिवसापासून थांबून आहे. याच सिनेमातील युनिट मधील एका ३०वर्षीय महिलेने विजय राज यांच्यावर छेडछाडीचा आरोप लावला आहे.

तिचा आरोप आहे कि सिनेमा शुटींग सुरु असताना विजय राज यांनी गेटवे हॉटेल मध्ये तिच्या सोबत जबरदस्ती केली. गोंदिया येथील रामनगर पोलीस स्टेशन मध्ये आयपीसी धारा ३५४ अ & ड नुसार कार्यवाही केली आहे. विजय राज यांनी रघु रोमियो, रन , गुलाबो सिताबो, भोपाल एक्स्प्रेस अश्या अनेक गाजलेल्या सिनेमात काम केले आहे.

रन सिनेमातील त्यांची भूमिका सगळ्याच्या मनात घर करून गेली या सोबत त्यांनी काही सिरीयस रोल देखील केले आहेत. तसेच धमाल,वेलकम, दिवाने हुये पागल, मुंबई टू गोवा,गली बॉय, ए सुटेबल बॉय सारख्या सिरीज तथा सिनेमात त्यांनी अभिनय केला आहे.

आपल्याला वरील माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *