बातम्या

मुंबई महापालिका निवडणुकीत युतीसाठी प्रकाश आंबेडकरांची शिवसेनेला ऑफर

उपचारानंतर प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत त्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीगसोबत युती करत असल्याची घोषणा त्यांनी केली.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तिन्ही पक्षांचं लवकरच जागा वाटप करण्यात येणार आहे. उद्यापासून प्रचाराला सुरुवात होणार असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत. तसेच आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास देखील तयार आहोत.

मात्र, शिवसेना आमच्यासोबत जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे असे ते म्हणाले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सेक्युलर पक्ष शिवसेनेसोबत युती करण्यास तयार असल्याचेही आंबेडकरांनी स्पष्ट केले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एमआयएमसोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता एमआयएमवर टीका केली आहे.

राज्य सरकारकडून ओबीसींची फसवणूक

राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणल्याचा ठपका प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर ठेवला आहे. राज्य सरकार ओबीसींचा विश्वासघात करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी काढलेला अध्यादेश न्यायालयात टिकणार नाही हे राज्य सरकारला माहीत होते, पण तरीही त्यांनी अध्यादेश काढला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button