Breaking News
Loading...
Home / बातम्या / सर्वात जास्त मानधन घेणारे टीव्ही कलाकार, कमाई वाचून तुम्हीही व्हाल हैराण

सर्वात जास्त मानधन घेणारे टीव्ही कलाकार, कमाई वाचून तुम्हीही व्हाल हैराण

आजपर्यंत तुम्ही बॉलीवूडमधील कलाकारांचे मानधन किती असते याविषयी बऱ्याचदा ऐकले असेल. बॉलीवूडचे कलाकार ज्याप्रकारे मोठ्या प्रमाणात मानधन घेतात तसंच काहीसं टीव्ही इंडस्ट्रीमध्ये देखील आहे. छोट्या पडद्यावरील कलाकारांचे मानधन देखील आजकाल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. छोट्या पडद्यावरील कलाकारांचे मानधन त्यांच्या लोकप्रियतेनुसार ठरते.

छोट्या पडद्यावर येणाऱ्या मालिकांची सध्या चांगलीच चलती सुरु आहे. पण अनेकांना या कलाकारांच्या मानधनाविषयी माहिती नसेल. खासरेवर जाणून घेऊया नेमकं हे कलाकार किती मानधन घेतात.

Loading...

१) कपिल शर्मा :

छोट्या पडद्यावर कपिल शर्मा लोकप्रियतेच्या बाबतीत शिखरावर आहे. कपिल शर्मा आपल्याला त्याच्या प्रसिद्ध कॉमेडी शोमधून भेटायला येतो. कपिल शर्मा अगोदर ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ या शोमधून घराघरात पोहचला. आता तो ‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून भेटीला येतो. कपिल शर्मा सध्या छोट्या पडद्यावर सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार आहे. कपिल शर्मा हा त्याच्या कार्यक्रमांच्या प्रत्येक एपिसोडसाठी तब्बल ६० ते ७० लाख रूपये मानधन घेतो.

२) सुनील गोव्हर :

कपिल शर्माप्रमाणेच सुनील ग्रोव्हर देखील आपल्या कॉमेडीमुळेच प्रसिद्ध झाला. सुनील ग्रोव्हर याचीही मोठी लोकप्रियता आहे. सर्वाधिक मानधन घेणा-या कलाकारांच्या यादीत तो दुस-या क्रमांकावर आहे. सुनील हा त्याच्या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी १० ते १२ लाख रूपये मानधन घेतो.

३) मिशाल रहेजा :

कॉमेडी शो पेक्षाही सिरीयल बघणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ‘इश्क दा रंग सफेद’, ‘लागी तुझसे लगन’ या मालिकांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता मिशाल चांगलाच लोकप्रिय आहे. तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतो. मिशाल एका एपिसोडसाठी १ ते 2 लाख रूपये मानधन घेतो.

४) रोनित रॉय :

रोनिय रॉय हा चेहरा देखील छोट्या पडद्यावर चांगलाच प्रसिद्ध आहे. रोनित रॉय हा छोट्याच नाही तर मोठ्या पडद्यावर देखील झळकतो. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तो काम करतो. रोनित एका एपिसोडसाठी १.२५ लाख रूपये मानधन घेतो.

५) राम कपूर :

रोनिय रॉय प्रमाणेच राम कपूर देखील दोन्ही पडद्यावर झळकत असतात. त्यांच्या मालिका देखील चांगल्या लोकप्रिय आहेत. राम कपूर हे देखील एका एपिसोडसाठी १.२५ लाख रूपये मानधन घेतात.

५) हिना खान:

हिना खान ही छोट्या पडद्यावरील सध्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. हिना खानने बिग बॉसमधून सर्वांचे लक्ष वेधले. हिना खान मालिकेच्या एका एपिसोडसाठी १.२५ लाख रूपये मानधन घेते.

६) करन पटेल :

हिना खानप्रमाणे अभिनेत्यांमध्ये करन पटेल हा सध्या लोकप्रियतेच्या बाबतीत टॉपवर आहे. करन पटेल देखील मालिकेच्या एका एपिसोडसाठी १.२५ लाख रूपये मानधन घेतो.

७) जेनिफर विंगेट :

जेनिफर विंगेट ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात हॉट आणि सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. जेनिफरची ‘बेहद’ ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे ती मानधन देखील मोठ्या प्रमाणात घेते. जेनिफर एका मालिकेच्या एपिसोडसाठी १ लाख रूपये मानधन घेते.

८) मनिष पॉल :

मनिष पॉल हा वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोचं होस्टींग वा अवॉर्ड इव्हेंटचं शोचं होस्टींग करतो. मनिष ‘झलक दिखला जा’ च्या आगामी सीझनसाठी १.५ कोटी रूपये घेणार असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *