२०२० वर्षाचा शेवट होत आहे. हे वर्ष अनेक ऐतिहासिक गोष्टींसाठी प्रचलित झाले आहे. एका व्हायरसने सुरु केलेल्या महामारीने लाखो लोकांचे प्राण घेतले. हे वर्ष बॉलिवूडची देखील मोठे दुःखाचे राहिले आहे. या वर्षी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. जाणून घेऊया काही मोठ्या कलाकारांबद्दल..
१. इरफान खान-
इरफान खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार होता. इरफानने बॉलीवूडला एकसे बढकर एक असे हिट सिनेमे दिले. इरफानला २०१८ मधेच न्यूरोएंडोक्रिन ट्यूमर झाला होता. त्याने लंडनमध्ये उपचार घेतले पण उपयोग झाला नाही. कोरोनाच्या लॉकडाऊन दरम्यान २९ एप्रिल २०२० रोजी वयाच्या ५३ व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. इरफानच्या निधनाच्या ४ दिवसाआधीच त्याच्या आईचे देखील निधन झाले होते.
२. ऋषी कपूर-
इरफानच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते सावरले नव्हते तोवर ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आली. ३० एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे २९ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचं ३० रोजी निधन झालं.
३. वाजिद खान-
१ जून रोजी हार्ट अटॅकने संगीतकार वाजिद खान यांचे निधन झाले. ४७ वर्षीय वाजिद खान यांनी १९८८ मध्ये भाऊ साजिद खान सोबत सलमानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ सिनेमातून संगीतकार म्हणून सुरुवात केली होती. साजिद वाजिद हि भावांची जोडी खूप प्रसिद्ध होती. या जोडीने ‘मुझसे शादी करोगी’, ‘तेरे नाम’, ‘दबंग’, ‘रॉउडी राठौड़’, ‘एक था टाइगर’, ‘हीरोपंती’ या हिट सिनेमात अनेक हिट गाणे दिले.
४. सुशांत सिंग राजपूत-
छोट्या पडद्यापासून सुरुवात करून मोठ्या पडद्यावर यश मिळवणाऱ्या सुशांत सिंगने आपले जीवन संपवत जगाचा निरोप घेतला. ‘काई पो छे’ मधून करिअरची सुरुवात करणाऱ्या सुशांतला ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ने स्टार म्हणून ओळख दिली. १४ जून रोजी सुशांतने वयाच्या ३३ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
५. सरोज खान-
सिने इंडस्ट्रीमधील पहिली महिला कोरिओग्राफर सरोज खानचं ३ जुलै २०२० रोजी हर्ट अटॅकने निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी, ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर, सलमान ख़ान आणि शाहरुख़ ख़ान या दिग्गज कलाकारांना डान्सचे धडे दिले.
६. जगदीप-
शोले मध्ये प्रसिद्ध सुरमा भोपालीची भूमिका साकारणाऱ्या जगदीपने ८१ व्या वर्षी ८ जुलैला जगाचा निरोप घेतला. ७० वर्ष इंडस्ट्रीत काम केलेल्या जगदीप यांनी अनेक सिनेमात भूमिका निभावल्या पण शोलेची भूमिका अमर झाली.
७. निशिकांत कामत-
मराठी सिनेमा डोंबिवली फास्टने आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या निशिकांत कामतने १७ ऑगस्ट रोजी हैद्राबाद मध्ये शेवटचा श्वास घेतला. ५० वर्षीय निशिकांत कामतचे लिव्हर खराब झाले होते. निशिकांतने ‘मुंबई मेरी जान’, ‘फोर्स’, ‘लय भारी’, ‘दृश्यम’, ‘भावेश जोशी’ हे सुपरहिट सिनेमे दर्शकांना दिले.
८. असिफ बसरा-
असिफ बसराने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी छवी निर्माण केली होती. २ दशके त्यांनी सिनेमात काम केलं. १२ नोव्हेंबरला ते आपल्या घरात मृत सापडले होते.
९. रवी पटवर्धन-
तेज़ाब, यशवंत, उंबरठा, अंकुश, राजू बन गया जेंटलमैन, तक्षक, हफ्ता बंद, बंधन, तेजस्विनी या सिनेमात काम केलेले मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचं ५ डिसेंबर रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं. हर्ट अटॅकने त्यांचं निधन झालं. ते सुप्रसिद्ध मराठी अभिनेते होते.
१०. आशालता वाबगावकर-
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा असलेल्या आशालता यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झाले. साताऱ्यात मालिकेच्या शुटिंगवेळी त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्या ७९ वर्षाच्या होत्या. त्यांनी अनेक मालिकांसह मराठी हिंदी सिनेमात काम केलं.