बातम्या

ठाण्यामध्ये टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक झाला पलटी; २० टन टोमॅटोचे झाले नुकसान

महाराष्ट्र राज्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. अपघातांची मालिका कोरोनाच्या काळात पण थांबलेली नव्हती. ठाण्यामध्ये एका ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. टोमॅटो घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याची दुःखद घटना घडली आहे. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे.

या ट्रकमध्ये जवळपास २० टन कांदा होता. हा ट्रक रस्त्याच्या बरोबर उलटला, त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे कांद्याचा ढीग पडलेला दिसून आला आहे. ट्रक उलटल्यामुळे रस्त्यावर सगळीकडे टोमॅटोचा ढीग पडला होता. रस्त्यावर टोमॅटो पडल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रंग लागल्या होत्या.

या रस्त्यावरच्या पडलेल्या टोमॅटोना बाजूला काढण्यासाठी क्रेन आणि पोकलॅनची मदत घेण्यात आली. रस्त्यावर पडलेल्या टोमॅटोला बाजूला केल्यानंतर रात्री आठ वाजल्यापासून वाहतूक चालू करण्यात आली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर माल असल्यामुळे ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकला.

ट्रक पलटी झाल्यानंतर त्याच्यातील टोमॅटो अस्ताव्यस्त पद्धतीने रस्त्यावर सगळीकडे विखुरले होते. त्यानंतर वाहतुकीचा पण मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला. ठाण्यामधील ज्ञानसाधना महाविद्यालयासमोर हा अपघात झाला. वाहनांच्या अपघातामुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले. रस्त्यावर पडलेल्या टोमॅटोचा खच बाजूला काढण्यासाठी जेसीबीला बोलवण्यात आले. त्यानंतर रात्री आठ वाजता वाहतूक चालू करण्यात आली. रस्त्यावर होत जाणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे असून त्यावर वेळीच रोख घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button