Breaking News
Loading...
Home / आरोग्य / चेहऱ्याला मास्क लावत असताना या गोष्टींची काळजी घ्यायला चुकूनही विसरु नका

चेहऱ्याला मास्क लावत असताना या गोष्टींची काळजी घ्यायला चुकूनही विसरु नका

सोशल मीडियावर कोरोनाबद्दलचे अनेक मिम्स आणि जोक्स व्हायरल होत आहेत. कोरोना पसरवला चीनच्या लोकांनी आणि तोंड संपूर्ण जगाला झाकायला लागत आहे अशा आशयाचे ते मिम्स आहेत. विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर कोरोनासारख्या महामारीवर अद्याप कुठली लस सापडली नसल्यामुळे त्या रोगाचा समूळ नष्ट करण्यासाठी वैयक्तिक सावधगिरी किती गरजेची आहे ते डॉक्टरांनाच विचारा. मास्क लावल्याने कोरोना नष्ट होत नाही, परंतु त्यापासून नक्की वाचता येते. परंतु मास्क वापरत असताना देखील काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोनापासून वाचण्यासाठी कोणता मास्क गरजेचं आहे ?

Loading...

कोरोनापासून वाचण्यासाठी असा मास्क घ्या, ज्याची रेटिंग एन-९५ असेल. मास्क घेतेवेळी एका गोष्टीची काळजी अवश्य घ्या, ती म्हणजे मास्क तुमच्या चेहऱ्याला फिट बसेल असा घ्या. सैल मास्क घातल्याने हवा आतबाहेर येत जात राहते आणि असा मास्क काही उपयोगाचा नसतो. डॉक्टर लोक देखील एन-९५ मास्कचाच वापर करतात. सर्दी खोकला असणाऱ्या लोकांनी तर अवश्य मास्क घालायला हवा. घरातील स्वच्छ धुतलेला रुमालही मास्क म्हणून वापरता येईल.

चेहऱ्याला मास्क लावत असताना या गोष्टींची काळजी घ्यायला चुकूनही विसरु नका

१) मास्क लावत असताना नाकाच्या वरुन त्याला व्यवस्थित दाबून बसावा. २) मास्क घातल्यानंतर त्याला वारंवार हात लावू नये.

३) आपण घालत असेलला मास्क इतरांना वापरायला देऊ नये, तसेच इतर वापरत असलेला मास्क आपण वापरु नये. ४) मास्क काढत असताना समोरुन किंवा आतील बाजूने पकडू नये.

५) मास्कचा वापर झाल्यानंतर त्याला इकडेतिकडे न टाकता व्यवस्थितरीत्या डिस्पोज करावे. ६) मास्क काढल्यानंतर २० सेकंद हात स्वच्छ धुवावेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *