Breaking News
Loading...
Home / बातम्या / ‘छपाक’ टॅक्स फ्री करुनही ‘तान्हाजी’ने कमावले पहिल्या दिवशी तब्बल ‘एवढे’ कोटी!

‘छपाक’ टॅक्स फ्री करुनही ‘तान्हाजी’ने कमावले पहिल्या दिवशी तब्बल ‘एवढे’ कोटी!

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपट काल प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाचे ट्रेलर आणि टिझर बघूनच त्याला शिवाजी महाराज व तानाजीवर प्रेम करणारे प्रेक्षक डोक्यावर घेणार असे दिसत होते. अन झालेही असेच, तान्हाजी चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. हा चित्रपट पहिल्या दिवशी जी कमाई करेल असे बोलले जात होते त्यापेक्षा अधिक कमाई चित्रपटाने केली आहे.

चित्रपट समीक्षकांनी तान्हाजी हा पहिल्या दिवशी १० कोटींची कमाई करेल असे अंदाज मांडले होते. पण रिलीज झाल्यानंतर प्रत्यक्षात बक्कळ कमाई चित्रपटाने पहिल्या दिवशी केली आहे. देशभरात अनेक ठिकाणी हाउसफुल्लच्या पाट्या झळकत होत्या. तान्हाजीने पहिल्या दिवशी १५ कोटींची कमाई केली आहे.

Loading...

तानाजी चित्रपट देशभरात ३८८० स्क्रीनवर रिलीज झाला. तर परदेशात चित्रपटाला ६६० स्क्रीन्स मिळाल्या. अजय देवगणचा हा १०० वा चित्रपट असल्याने त्याने यात विशेष मेहनत घेतली होती. चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त काजोल आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ओम राऊत यांनी तान्हाजी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तान्हाजींची भूमिका साकारली आहे तर तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका काजोल साकारताना दिसत आहे. तर मराठमोळा अभिनेता शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

तान्हाजी सोबत रिलीज झाला छपाक-

तान्हाजी चित्रपटासोबत दीपिका पदुकोणचा बहुचर्चित छपाक देखील रिलीज झाला. दोन्ही चित्रपटांची मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चा सुरु होती. दीपिका पदुकोणने JNU मधील विद्यार्थ्यांची भेट घेतल्याने वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर छपाक बघू नका म्हणून ट्विटरवर मोहीम देखील घेण्यात आली होती.

तर काँग्रेसने छपाक सिनेमाला आपला पाठिंबा दर्शवत काँग्रेस शासित मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये छपाक टॅक्स फ्री केला होता. टॅक्स फ्री केल्यानंतरही तान्हाजी मात्र छपाकला वरचढ ठरला आहे. छपाकने पहिल्या दिवशी ४.७७ कोटींची कमाई केली तर तान्हाजीने पहिल्या दिवशी १५ कोटी कमावले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *