Breaking News
Loading...
Home / बातम्या / तंगडे तोडल्याशिवाय जाऊन देणार नाही; संजय राऊत यांनी सामनातून भाजपवर केला हल्लाबोल

तंगडे तोडल्याशिवाय जाऊन देणार नाही; संजय राऊत यांनी सामनातून भाजपवर केला हल्लाबोल

महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र असल्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद चालू असतात. भाजपच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केल्यामुळे सगळीकडे वातावरण मोठ्या प्रमाणावर तापले आहे.

शिवसेना पक्षाच्या सामना अग्रलेखातून भाजपवर अतिशय कडवट शब्दात टीका करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापले गेले आहे. संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाच्या अग्रलेखातून लिहिले आहे की, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही पायावर याल पण त्यानंतर मात्र तुम्हाला जाताना कदाचित खांद्यावर जाण्याची वेळ येईल असे त्यांनी लिहिले आहे.

Loading...

सर्वानीच भाजपवर मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे. भाजपवर टीका खुद्द मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे याबद्दल सगळीकडे चर्चेला जोर आला आहे. संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून लिहिले आहे की, मराठी माणूस या राजकीय बेवड्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही.

तरीही अंगावर यायचे असेल तर या, तेवढी मर्दानकी शिल्लक असेल तर या. पण एक लक्षात ठेवा. शिवसेना भवनपर्यंत तुम्ही पायावर याल पण कदाचित हे पण लक्षात ठेवा की जाताना तुम्हाला कदाचित खांद्यावर जाण्याची वेळ येईल. असे संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून लिहिले आहे.

महाराष्ट्राच्या मुळावर येणार्यांना खांद्यावर जावे लागते हा इतिहास आहे. शिवसेना भवनाच्या आसपास उभे राहण्याची त्यांची हिंमत नाही. तेजस्वी सूर्यावर थुंकून लक्ष वेधून घेण्याच्या पलीकडे त्यांना काही येत नाही. संजय राऊत यांच्या आक्रमक पणामुळे सगळ्या राजकीय वर्तुळातील चर्चाना उधाण आले आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *