Breaking News
Loading...
Home / बातम्या / ताजमहाल बद्दलच्या लोकांमध्ये आहेत या ११ अफवा

ताजमहाल बद्दलच्या लोकांमध्ये आहेत या ११ अफवा

जगातील सातवे आश्चर्य असणाऱ्या ताजमहाल बद्दल लोकांमध्ये अनेक प्रकारच्या अफवा प्रचलित आहेत. परंतु अनेक इतिहासकार आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार वास्तव काही वेगळेच आहे. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

१) ताजमहालमध्ये आहे गुप्त दरवाजा !
वास्तव – शहाजहानचे प्रेत दफन करण्यासाठी ज्या रस्त्याने नेण्यात आले होते, तो रस्ता विटा बांधून बंद करण्यात आला आहे. आता त्याठिकाणी कुठलाही दरवाजा नाही.

Loading...

२) दिवसभरात ताजमहाल अनेकदा रंग बदलतो !
वास्तव – शुभ्र संगमरवरावर सूर्याची किरणे पडल्यामुळे असे होते. त्यामुळे ताजमहाल दिवसा सोनेरी आणि संध्याकाळच्या वेळी गुलाबी दिसतो.

३) ताजमहालात दफन आहे मुमताजचे प्रेत !
वास्तव – भारतीय पुरातत्व विभागाकडे याबद्दलचा कुठलाही पुरावा नाही. १७ जून १६३१ रोजी मध्यप्रदेशमधील बुऱ्हाणपूर येथे मुमताजचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचे प्रेत आधी बुऱ्हाणपूर येथे आणि नंतर ताजमहालाच्या मुख्य स्मारकात दफन करण्यात आले.

४) ताजमहालाचा नकाशा स्वप्नामध्ये बनला होता !
वास्तव – इतिहासाच्या संदर्भानुसार ताजमहालाच्या डिझाइनसाठी जगभरातील वास्तुविशारदांची मदत घेण्यात आली होती. परंतु नेमकी डिझाईन कोणी बनवली होती याची माहिती उपलब्ध नाही.

५) शहाजहानला काळा ताजमहाल बनवायचा होता !
वास्तव – भारतीय पुरातत्व विभागाच्या अनुसार गाईड लोकांनी १९१० पासून काळ्या ताजमहालाबद्दलची दंतकथा
रचली आहे.

६) ताजमहालाच्या शिवमंदिर आहे !
वास्तव – भारतीय पुरातत्व विभागाने कोर्टात सांगितले आहे की ताजमहालात हिंदू मंदिर असल्याचा कोणताही पुरावा नाही. ताजमहालाची रचना शहाजहानने केली होती.

७) चांदण्या रात्रीत ताजमहाल चमकतो !
वास्तव – ताजमहालाच्या बांधकामात जगभरातील २८ प्रकारचे दगड वापरण्यात आले आहेत. यामधील काही दगडांची खासियत अशी आहे की ते चंद्राच्या प्रकाशात चमकतात.

८) शहाजहान – मुमताजच्या थडग्यावर पाणी टपकते !
वास्तव – उरुसाच्या काळात जास्त गर्दी असल्याने वातावरणातील आर्द्रता वाढते, त्यामुळे भिंतीवर पाण्याचे थेंब येतात.

९) ताजमहाल बांधल्यानंतर शहाजहानने २० हजार कारागिरांचे हात तोडले !
वास्तव – शहाजहानने ताजमहाल बांधून झाल्यावर कारागिरांकडून आयुष्यभर इतर कुठलेही बांधकाम न करण्याचे वचन घेतले होते. याबदल्यात त्याने सर्वांना आयुष्यभर मोबदला दिला.

१०) मुमताजच्या दुःखात झाला होता शहाजहानचा मृत्यू !
वास्तव – शहाजहानच्या मृत्यूच्या अफवेनंतर त्याच्या मुलांमध्ये युद्ध झाले. औरंगजेबाने विजय मिळवून शहाजहानला बंदी बनवले. वयाच्या ७४ व्या वर्षी आजारपणाने शहाजहानचा मृत्यू झाला.

११) भूत-प्रेत ताजमहालाच्या बांधकामात अडचणी आंत होते !
वास्तव – भारतीय पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार या गोष्टी निराधार आहेत.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *