नवीन खासरेबातम्या

मुंबईच्या ताज हॉटेलात काम करणाऱ्या वेटरला नेमका असा पगार असतो तरी किती?

या जगात कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात असाल त्यात जर निपुण झालात आणि नेहमी यशाच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही एक यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जाल.

सगळ्या क्षेत्रात पैसा कमावण्याचे मार्ग आहेत, फक्त आपल्याला तो कमावता आला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही जर कुठल्या हॉटेलमध्ये काम करतो म्हणालात तर परिवार आणि समाजातील लोक तुमच्यावर हसतील, तुमची थट्टा उडवतील.

मात्र या क्षेत्रातील काही लोकांची कमाई बघितली तुमच्या हसणारे लोक आश्चर्यचकित होतील. त्यासाठी तुमच्याकडे गुणवत्ता आणि अन्य काही कौशल्ये असायला हवीत. प्रत्येक क्षेत्रात एक सर्वोच्च स्थान असते. वेटरांच्या दुनियेतही एक सर्वोच्च स्थान आहे. त्याबद्दल बोलायचे झाले तर आपण मुंबईच्या ताज हॉटेलचेच उदाहरण घेऊन बघूया. त्या हॉटेलात काम करणाऱ्या वेटर्सची मंथली सॅलरी जर तुम्ही जाणून घेतली तर तुम्हीही है राण होऊन जाल…

श्रीमंती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणजे ताज हॉटेल

ताज हॉटेल हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध हॉटेल आहे. केवळ भारतात नाही तर जगभरात त्याची ख्याती आहे. देशविदेशातील कित्येक व्यक्ती मुंबईला आल्यानंतर ताज हॉटेलमध्येच थांबतात, जेवतात आणि आनंद घेतात. याला तुम्ही अतिश्रीमंत लोकांचे हॉटेल असेही म्हणू शकता. इथे मिळणारी प्रत्येक गोष्ट सामान्य हॉटेलपेक्षा कित्येक पटीने महाग असते.

श्रीमंती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणजेच ताज हॉटेल ! इथे येणारे लोक जर एका दिवसासाठी लाखो रुपये खर्च करायला तयार असतात, तर इथे काम करणाऱ्या लोकांनाही तशीच चांगली सॅलरी मिळत असणार आणि आहेही तसेच !

ताज हॉटेलमध्ये काम करणारे वेटर्सना किती सॅलरी आहे ?

ताज हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर्समध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. जसे की त्यांचे शिक्षण, त्यांचे संभाषण कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, त्यांचा स्वभाव, इत्यादि. ताज हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर्सना अगोदर कित्येक मुलाखती द्याव्या लागतात. त्यानंतरच त्यांची निवड होऊन त्यांना ताज सारख्या आलिशान हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळते.

इथे काम करणाऱ्या वेटर्सला १ लाख ३० हजार रुपयांपासून १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत मंथली सॅलरी मिळते. खूप मोठ्या मोठ्या डिग्री घेऊनही लोकांना एवढी सॅलरी मिळत नाही. त्यामुळे वेटर्सची नोकरी सुद्धा काय कमी नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button