Breaking News
Home / नवीन खासरे / केबीसीमध्ये ५ कोटी जिंकलेल्या सुशील कुमारची व्यथा ऐकून डोक्याला हाथ मारून घ्याल!

केबीसीमध्ये ५ कोटी जिंकलेल्या सुशील कुमारची व्यथा ऐकून डोक्याला हाथ मारून घ्याल!

प्रत्येकाला जीवनात एकदा तरी वाटतं कि आपल्याला मोठी लॉटरी लागावी, एखादा जॅकपॉट लागावा किंवा मग बक्कळ पैसा मिळावा. त्यानंतर आपल्या आयुष्यात सुख शांती समाधान येईल आणि आपण आयुष्य सुखाने जगू असं वाटतं. पण एक गोष्ट मात्र कोणीच लक्ष देत नाही. ती म्हणजे पैसे आले तरी आपल्याला या गोष्टी मिळतील का? पैसे आपल्याला नीट वापरता येतील का?

तर याच उत्तर नाहीच असं म्हणावं लागेल. कारण असंच काहीसं घडलं आहे केबीसी या प्रसिद्ध शोमध्ये ५ कोटी रुपये जिंकणाऱ्या स्पर्धकासोबत. कौन बनेगा करोडपती मध्ये ५ कोटी जिंकलेल्या सुशील कुमारची व्यथा ऐकून तुम्हाला याचा प्रत्येय येईल.

सुशील कुमारने ५ कोटी जिंकल्यानंतर त्याची देशभरात चर्चा झाली होती. सुशील कुमार रातोरात एक सेलेब्रिटी बनला होता. पण हेच अल्प घटकेचे सेलेब्रिटी पद त्याच्या आयुष्यात संकटं घेऊन आलं. सुशील कुमारने एक फेसबुक पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्याने आपल्या आयुष्याची व्यथा मांडली आहे. केबीसीमध्ये ५ कोटी जिंकल्यानंतर त्याच्या आयुष्यात कसा वाईट काळ सुरु झाला हे त्याने सांगितले आहे.

सुशील कुमार केबीसीमध्ये ५ कोटी जिंकल्यानंतर सेलेब्रिटी बनला. तो घरी गेल्यानंतर त्याला एखाद्या सेलेब्रिटी सारखी वागणूक मिळायला लागली. त्याला घरचं सर्व काम सोडून १०-१५ दिवस कुठे ना कुठे कार्यक्रमांना जावे लागू लागले. याचा परिणाम शिक्षणावर झाला आणि शिक्षण सुटले. त्याने लोकांना दाखवण्यासाठी एक व्यवसाय सुरु केला. यामध्ये त्याचा बक्कळ पैसा वाया गेला.

केबीसीमध्ये पैसे जिंकल्यानंतर सुशील कुमारला गुप्तदान करण्याची सवय लागली. या सवयीमुळे त्याने खूप पैसे दान केले. त्याच्या या सवयीचा फायदा घेऊन त्याच्याकडे अनेक फसवणूक करणारे लोक आले आणि फसवून गेले. त्याच्या पत्नीने त्याला खूप समजावून सांगितले पण त्याने पत्नीचं न ऐकता पत्नीसोबतच भांडण केले.

शिवाय सुशील कुमारला रिकामे शौक देखील खूप लागले. सुशीलने अनेक कार खरेदी केल्या ज्या त्याने दिल्लीला पाठवल्या. त्यामुळे त्याला सतत दिल्लीला जावं लागलं. दिल्लीत त्याची ओळख अनेक विद्यार्थ्यांशी झाली. त्यातून सुशील कुमारला कळले कि आपण खूप मागे आहोत. याच काळात सुशीलला दा रू सिगारेटचे व्यसन देखील लागले.

सुशील कुमारला सिनेमामध्ये काम करण्याची देखील इच्छा झाली. त्याला दिग्दर्शक बनायचे स्वप्न पडू लागले. यासाठी तो मुंबईत गेला. तिथे एका प्रोडक्शन हाऊसमध्ये काम केले. पण काही जमलं नाही म्हणून तो पुन्हा घरी परतला. सर्व झाल्यावर बिहारमध्ये पोहचलेला सुशील कुमार आता एक चांगला शिक्षक बनला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *