Breaking News
Loading...
Home / बातम्या / सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू होण्याआधीच विकिपीडियावर त्याच्या निधनाची बातमी कशी आली ?

सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू होण्याआधीच विकिपीडियावर त्याच्या निधनाची बातमी कशी आली ?

सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूचे कोडे आणि त्याच्याशी निगडित प्रश्न संपायचे नावच घेत नाहीत. एका प्रश्नाचे निवारण झाले की लगेच दुसरा प्रश्न समोर आ वासून उभा राहत आहे. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशी एक चर्चा सुरू झाली आहे की सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू होण्याच्या आधीच विकिपीडियावरील सुशांतची माहिती देण्यात आलेल्या पेजवर त्याच्या निधनाची बातमी अपडेट करण्यात आली होती. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि सुशांतच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा सुशांतच्या मृत्युविषयी सीआयडी तपास करण्याची मागणी केली.

सुशांतच्या अंतिम क्षणांचा घटनाक्रम

Loading...

सुशांतच्या निधनाच्या बाबतीतचा घटनाक्रम पाहता साधारणपणे असा की सुशांत सकाळी ९ वाजता आपल्या बहिणीसोबत फोनवर बोलला. त्यानंतर साधारण १० वाजता तो आपल्या खोलीतून बाहेर आला आणि ज्यूस घेऊन परत आपल्या खोलीत गेला. त्यांनतर बराच दार ठोठावूनही दार न उघडल्याने नोकरांनी दार तोडण्याचा नितीन घेतला पण दार तुटले नाही.

त्यांनतर १२;३० वाजण्याच्या सुमारास शेजारील एका चावी बनवणाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. तोपर्यंत सुशांतने स्वतःची जीवनयात्रा संपवली होती. परंतु विकिपिडियावर सुशांतच्या मृत्यूची बातमी अपडेट केल्याची वेळ आहे सकाळच्या ८ वाजून ५९ मिनिटे !

सुशांतच्या निधनाआधीच विकिपीडियावर त्याच्या निधनाची बातमी अशी झाली होती अपडेट

सुशांतच्या मृत्यू सकाळी १० ते दुपारी १२:३० दरम्यान झाला, मग विकिपीडिआयवर सकाळी ८:५९ वाजताच त्याच्या निधनाची अपडेट कशी टाकण्यात आली याचा तपास केल्यानंतर जी गोष्ट समोर आली त्याने सर्वांचे कुतूहल शांत झाले आहे. वास्तविक पाहता विकिपिडिया हे Coordinated Universal Time Zone अनुसार चालते, जे प्रमाणित भारतीय वेळेनुसार ५:३० तास मागे आहे.

त्यानुसार आपल्याला विकिपीडियावर जी सकाळच्या ८:५९ वाजता टाकलेली अपडेट दिसत आहे, ती वास्तविकरीत्या भारतीय वेळेनुसार दुपारच्या २:२९ वाजताची, म्हणजेच सुशांतच्या निधनानंतरची आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *