Breaking News
Home / नवीन खासरे / ‘या’ कारणामुळे असते रविवारी सुट्टी

‘या’ कारणामुळे असते रविवारी सुट्टी

जेव्हा आठवडाभर काम करून आपण दमतो तेव्हा रविवारी सुट्टी असल्यामुळे आपल्याला आनंद होतो. या दिवशी असलेली सुट्टीची आठवडाभर आपण वाट पाहत असतो. काही जणांना या दिवशी आराम करून निवांत व्हायचे असते तर काही जणांना या दिवशी कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचे असते. पण आपण असा कधी विचार केला आहे का, रवीवारच्याच दिवशी सुट्टी का असते?

यामागे एक इतिहास सांगितला जातो. तो इतिहास काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा भारत पारतंत्र्यात होता तेव्हा मिल मजदुरांकडून ब्रिटिश सरकार भरपूर काम करून घेत असायचे. जरी ब्रिटिश अधिकारी रविवारी चर्चमध्ये जात असले तरी या कामगारांना मात्र सुट्टी नसायची. त्यामुळे ते कंटाळून काम करत असत.

यावेळी नारायण कृष्णाजी लोखंडे यांनी मिल मजदुरांना रविवारी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी केली होती . समाजासाठी आणि देशासाठी एक दिवस मिळायला हवा हे त्यांनी बोलून दाखवले होते. त्या दिवशी हिंदू देवता खंडोबाची पूजा केली जाते. पण त्यांची मागणी ब्रिटिश सरकारने फेटाळून लावली होती. हा संघर्ष जवळपास ७ वर्ष चालला होता.

त्यानंतर १८९० साली इंग्रज सरकारने ही सुट्टी जाहीर केली. जेव्हा ही सुट्टी जाहीर केली तेव्हा खऱ्या अर्थाने या आंदोलनाचा विजय झाला होता. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यानंतर रविवारची सुट्टी का देण्यात आली याबद्दल कोणीही कोणताही उल्लेख केलेला नाही. खऱ्या अर्थाने या दिवशी भारतात रस्त्यावरील वाहतूक कमी असते आणि सगळे घरी निवांत असतात.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published.