Breaking News
Home / नवीन खासरे / १० हजार रुपयात सुरु करू शकता हे १० छोटे उद्योग, जे कमवून देऊ शकतात ५० हजार रुपये महिना

१० हजार रुपयात सुरु करू शकता हे १० छोटे उद्योग, जे कमवून देऊ शकतात ५० हजार रुपये महिना

नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मागील काही काळात भारतात युवकांमध्ये नोकरी सोडून स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसऱ्याकडे काम करण्यापेक्षा स्वतःच्या कंपनीचा बॉस बनणे प्रत्येकाला आवडते. स्वतःच्या व्यवसायात स्वातंत्र्य मिळते आणि कमाई देखील होते पण त्यामध्ये मेहनत देखील मोठ्या प्रमाणात लागते.

आज आपण काही असे छोटे व्यवसाय बघूया जे कमी पैशात सुरु होऊ शकतात.

१. ट्रॅव्हल एजन्सी- भारतात ट्रॅव्हल एजन्सीचा उद्योग खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या व्यवसायाची खासियत म्हणजे यामध्ये गुंतवणूक फार कमी लागते. तुम्ही एखाद्या छोट्या शहरात किंवा खेड्यात राहत असाल तर तुम्ही घरून हा व्यवसाय चालवू शकता.

२. मोबाईल रिचार्ज शॉप- आज ऑनलाईन रिचार्ज करण्याची सोय असली तरी आजही असंख्य लोक असे आहेत जे मोबाईल शॉप मध्ये जाऊन रिचार्ज करणे पसंत करतात. जे हा व्यवसाय करू इच्छिता ते एखादी छोटी दुकान घेऊन सुरुवात करू शकतात. यासोबतच तुम्ही इतर काही सुविधा देखील पुरवू शकता.

३. नास्ता सेंटर- हा तर खूपच चालणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात सुरु केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला ग्राहकांचा शोध घ्यायची गरज नाही. एक वेळ जर ग्राहकाला दुकान माहिती झालं आणि तुम्ही त्याला चांगली चव दिली तर तो पुन्हा तुमच्या दुकानात येणारच. या व्यवसायास देखील खूप कमी पैशांची गरज आहे.

४. ट्युशन/कोचिंग सेंटर- जर तुम्ही शिकलेले असाल आणि पैसे कमवायचे असतील तर ट्युशन हा तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही मित्रांचा एखादा ग्रुप बनवून ट्युशन चालू करू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे हा व्यवसाय सुरु करण्यास देखील जास्त गुंतवणूक लागत नाही.

५. ज्यूस शॉप- आजकाल प्रत्येकाला आरोग्याची काळजी असते. ज्यूस हे आपल्या आरोग्याशी निगडित आहे. वेगवेगळ्या ज्यूसचे शरीराला असंख्य फायदे असतात. यासाठी देखील तुम्हाला एक मशीन आणि फळांची गरज पडेल.

६. टेलरिंग- प्रत्येक शहरात किंवा खेड्यात टेलरची आवश्यकता मोठी असते. आजकाल तर बदलत्या फॅशनसोबत टेलर कडून कपडे शिवण्याची मागणी वाढली आहे. मार्केटमध्ये चांगल्या टेलरला नेहमीच डिमांड राहते. यामध्ये थोड्या गुंतवणुकीची आवश्यकता असते. पण हा बिजनेस देखील खूप कमाई करून देऊ शकतो.

७. टिफिन सर्व्हिस- शहरात आपण बघतो कि असंख्य विद्यार्थी आणि नोकरी करणार्यांना डब्यांची आवश्यकता असते. हा व्यवसाय देखील तुम्ही थोडी जास्त गुंतवणूक करून सुरु करू शकता. यामध्ये देखील मोठी कमाई केली जाउ शकते.

८. रस्त्याच्या कडेला पुस्तकांचं दुकान- हा धंदा दिसायला छोटा दिसतो पण यामध्ये देखील मोठी कमाई केली जाऊ शकते. रस्त्याच्या कडेला दुकान लावल्यास जास्त किराया देखील द्यावा लागत नाही. रस्त्याच्या कडेला पुस्तक स्वस्त विकल्यास ग्राहक देखील जास्त मिळू शकतात. यासाठी तुम्हाला आधी परवानगी घ्यावी लागू शकते.

९. टी स्टॉल- भारतात चहाचा धंदा खुप जोरात चालतो. कोणत्याही ऋतूत चहाचा व्यवसाय जोरात चालतो. चहा प्रेमींना नेहमीच चहा लागतो. हा व्यवसाय देखील कमी पैशात सुरु केला जाऊ शकतो.

१०. स्पोर्ट्स कोचिंग- हे काम फक्त तेच करू शकतात ज्यांनी स्पोर्ट्स मध्ये चांगले प्राविण्य मिळवले आहे. यामध्ये यशस्वी होण्याचे खूप चान्स आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *