देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलं आहे. देशातील इतर राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातही ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी ८०० कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली. तो बचत गटाच्यावतीने चालवला जातो. पोल्ट्री फॉर्ममध्ये ८००० हजार कोंबड्या असून, त्यापैकी ८०० कोंबड्या मरण पावल्या आहेत.
सध्या देशात कोरोनाचा धोका टळला नसताना बर्ड फ्लू आल्याने पुन्हा एकदा संकट आलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, केरल, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि झारखंड मध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांचा मृत्यू झाला आहे. देशात बर्ड फ्लू वेगाने पसरत असल्याचे चित्र आहे.
सोमवारी केरळ हिमाचल प्रदेश आणि राजस्थानच्या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट झाले तर आज महाराष्ट्रात देखील याचा शिरकाव झाल्याची माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे.
हा नेता म्हणतो मोदींमुळे आला बर्ड फ्लू-
केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले.
दरम्यान समाजवादी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने बर्ड फ्लू हा मोदींमुळे पसरला असल्याचा अजब दावा केला आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते असणाऱ्या आय. पी. सिंह यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विट करुन बर्ड फ्लूवरुन निशाणा साधला आहे.
इस व्यक्ति का क्या करें? पक्षियों को दाना खिलाया तो बर्ड फ्लू की चपेट में आ गए बेचारे। pic.twitter.com/mPWcHCnXzj
— I.P. Singh (@IPSinghSp) January 8, 2021
आय. पी. सिंह यांनी पंतप्रधान मोदी मोराला दाणे खायला घालत असतानाच फोटो ट्विट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना सिंह यांनी, “या माणसाचं काय करावं? पक्षांना दाणे खायला घातले तर पक्षी बर्ड फ्लूच्या कचाट्यात सापडले,” अशी कॅप्शन दिली आहे.