Breaking News
Loading...
Home / बातम्या / फाळणीच्या पार्श्वभूमीवर नेहरुंच्या विरोधानंतरही झाला होता सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार

फाळणीच्या पार्श्वभूमीवर नेहरुंच्या विरोधानंतरही झाला होता सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार

गुजरातच्या प्रभास पाटण येथी सोरटी सोमनाथ मंदिर हे महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या मंदिराला फार महत्व आहे. गझनीच्या मोहम्मदाने सोमनाथ मंदिरावर हल्ला करुन त्याठिकाणी प्रचंड तोडफोड आणि लुटालूट केल्याचा इतिहास आहे. जितक्या वेळेस हे मंदिर तोडण्यात आले, तितक्या वेळेस शिवभक्तांनी पुन्हा त्याच ठिकाणी मंदिर बांधून उभे केले.

अहिल्यादेवी होळकरांनीही या सोमनाथाचे मंदिर बांधल्याचे संदर्भ सापडतात. आतापर्यंत ७ वेळा सोमनाथ मंदिर बांधण्यात आले आहे. सातव्या वेळेस मंदिर बांधत असताना तत्कालीन प्रधानमंत्री नेहरुंनी त्याला विरोध केला होता, पण त्यामागचे तथ्य काय आहे समजून न घेता नेहरूनावर टीका केली जाते. आज आपण ते तथ्य समजून घेणार आहोत.

Loading...

सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे इतिहास आणि नेहरुंचा विरोध

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तान ही दोन वेगवेगळी राष्ट्रे निर्माण झाली. त्याच दिवशी गुजरातमधील जुनागढ संस्थानाच्या नवाबाने पाकिस्तानचे निर्माते बॅरिस्टर जीनांशी गुप्त पत्रव्यवहार करुन जुनागढ संस्थान पाकिस्तानमध्ये सामील करत असल्याचे सांगितले. नवाबाच्या या निर्णयाविरोधात संस्थानातील प्रजेने आंदोलनाला सुरुवात केली. भारत सरकारने या आंदोलनाला पाठींबा दिला. सरदार वल्लभभाई पटेलांनी लष्करी कारवाई करुन जुनागढ भारतात सामील करुन घेतले. त्यावेळी एका जनसभेला संबोधित करताना सरदार पटेलांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची घोषणा केली.

सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत त्यावेळच्या प्रमुख नेत्यांची मते वेगवेगळी होती. धार्मिक आधारावर नुकत्याच झालेल्या फाळणी आणि संस्थानांच्या विलीनीकरणाच्या जखमांमधून देश सावरत असताना मंदिराच्या जीर्णोद्धाराचे विषय देशाच्या जखमेवरील खपली काढण्यासारखे आहे असे नेहरुंना वाटायचे.

नेहरूंच्या मते सोमनाथ मंदिर हे भारताच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक होते, मात्र मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे हिंदुत्वाला पुनर्जीवन देण्याचा प्रयत्न असल्याची त्यांना शंका होती. त्यांचे मत होते. आपल्या देशात लोकांना धार्मिक स्वातंत्र्य आहे, परंतु आपला देश निधर्मी आहे असे मानणारे नेहरु होते.

शेवटी लोकवर्गणीतून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु झाले. दरम्यान महात्मा गांधीचा खून झाला. लवकरच सरदार पटेलांचेही निधन झाले. त्यानंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळातील के.एम.मुन्शी यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराची जबाबदारी उचलली. नेहरूंच्या हिंदुत्वाच्या पुनर्जीवनाच्या मुद्द्याचे खंडन करताना मुन्शीन्नी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धाराला त्यांनी भारताच्या सामूहिक अवचेतनेचे नाव दिले. १९५१ साली राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांना मंदिराच्या उद्घाटनासाठी निमंत्रण देण्यात आले. प्रधानमंत्री नेहरूंनी त्यांनाही उदघाटनाला जाऊ नये अशी विनंती केली. पण नेहरूंची विनंती डावलून राजेंद्रप्रसाद सोमनाथ मंदिराच्या उदघाटनाला गेले.

नेहरु हे स्वतः हिंदू होते, मात्र ते लोकशाहीवादी होते. देशाच्या राज्यघटनेने देशाला कुठलाही अधिकृत धर्म नसल्याचे सांगत असताना देशातील नागरिकांना त्यांच्या पसंतीच्या धार्मिक श्रद्धांचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. नेहरू हे देशाचे नेतृत्व करत असल्याने त्यांनी स्वतः राज्यघटनेचा आदर करणे बंधनकारक होते, तसेच आपल्या कुठल्याही कृतीने राज्यघटेचा भंग होईल असे वागून त्यांना चालणार नव्हते. त्यामुळे नेहरूंनी पटेल, मुन्शी, राजेंद्रप्रसाद यांना सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या मुद्द्यावरुन विरोध केला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *