Breaking News
Loading...
Home / बातम्या / ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमनलाही होते बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कुतूहल

ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमनलाही होते बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कुतूहल

क्रिकेट खेळामध्ये एखाद्या बॅट्समनचे यश कशाच्या आधारे मोजले जात असेल, तर ते म्हणजे त्या बॅट्समनचे ऍव्हरेज ! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक ऍव्हरेज असणारा आणि ज्याच्या आसपासही कुणाला फिरकता आले नाही असा एकमेव बॅट्समन होऊन गेला तो म्हणजे सर डॉन ब्रॅडमन ! ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट सरासरी होती ९९.९४, तेच ऍव्हरेज क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या बाबतीत ५३.७९ होते. यावरुन तुम्हाला ब्रॅडमन यांच्या खेळाविषयी अंदाज येईल.

तर अशा या डॉन ब्रॅडमन यांना केवळ क्रिकेटमध्येच जास्त रस होता असे नाही, तर वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यामध्येही ते इच्छुक असायचे. ब्रॅडमन जिथे खेळायला जातील तिथल्या विविध गोष्टी जाणून घ्यायला त्यांना प्रचंड आवडायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबद्दलही ब्रॅडमन यांना फार कुतूहल होते. खुद्द सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेटपटू विनू मं कड यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या गोष्टीचा उलगडा केला.

Loading...

१९७७-७८ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती गेलेला असताना दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनच्या वतीने भारतीय खेळाडूंसाठी एका डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आलेले होते. सगळे भारतीय खेळाडू त्या पार्टीत सहभागी झाले. त्यामध्ये सुनील गावसकरही होते. गावसकर आपल्या जागी जाऊन बसले. त्यांच्या शेजारची खुर्ची रिकामी होती. काही वेळाने दस्तुरखुद्द डॉन ब्रॅडमन त्या मोकळ्या खुर्चीवर येऊन बसले. डॉन ब्रॅडमन आणि गावसकरांमध्ये गप्पा रंगल्या.

डॉन ब्रॅडमन गावसकरांना त्यांच्या भारतीय क्रिकेट संघाबाबतच्या आठवणी सांगू लागले. आठवणी सांगताना त्यांनी अचानक गावस्करांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षाविषयी माहिती विचारली. ब्रॅडमन यांना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबाबत असणारे कुतूहल पाहून गावसकर अचंबित झाले. पण त्यांनी ब्रॅडमन यांना बाळासाहेब आणि शिवसेनेबद्दल माहिती देऊन त्यांचे कुतूहल दूर केले.

वास्तवात बाळासाहेब ठाकरे हे क्रिकेटचे फार मोठे चाहते होते. मैदानाबाहेर राहून मुंबई क्रिकेटसाठी त्यांनी दिलेले योगदान क्रिकेटप्रेमी कधीही विसरु शकणार नाहीत.

भारताचे तत्कालीन विकेटकिपर बॅट्समन माधव मंत्री यांनी डॉन ब्रॅडमनला अनेकदा चकवणाऱ्या डग राईट या बॉलरला पुढे सरसावून मारलेला षटकार थेट ब्रिटनच्या आयुक्तांनी झेलला होता. बाळासाहेब ठाकरे या माधव मंत्री यांचे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यांनाच खेळ पाहण्यासाठी बाळासाहेब नेहमी शिवाजी पार्कवर जायचे.

Loading...

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *