शिवसेनेच्या या नेत्यांवर नारायण राणे करणार का कारवाई? राणे आणि सोमैय्या यांच्या भेटीने वाढली उत्सुकता

देशाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर उलथापालथं घडून येत असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील राजकारण पण मोठ्या प्रमाणावर बदललल्याचे दिसून आले आहे. दोन वेशांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पण भाजपत प्रवेश केला. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे.
नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे किरीट सोमैया यांनी दिल्लीत जाऊन नारायण राणे यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी नारायण राणे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी कोकणातील मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या हॉटेल आणि रिसॉर्ट बाबत कारवाई करण्यासंदर्भात चर्चा केली आहे.
किरिट सोमैय्या यांनी अनेक राजकीय नेत्यांच्या रिसॉर्ट आणि हॉटेलच्या संदर्भात अनेक आरोप केले होते. त्यावरून नारायण राणे यांच्याशी त्यांच्या झालेल्या भेटीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. त्यांनी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांच्यावर आरोप केले होते.
किरिट सोमैय्या सतत नेत्यांवर आरोप करत असतात. त्यात सर्वात जास्त शिवसेना नेत्यांचा समावेश असतो. त्यांनी अनेक नेत्यांच्या मालमत्ता प्रकरणावरून नवं नवीन गोष्टी बाहेर काढल्या आहेत. मात्र जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा सोमैय्या यांनी राणे यांच्या संपत्तीच्या तपासाची मागणी केली होती.