Breaking News
Loading...
Home / नवीन खासरे / शेतकऱ्याच्या बंगल्याला दिले हे नाव की; नाव ऐकून संशोधकांनी पण दिली घरी भेट

शेतकऱ्याच्या बंगल्याला दिले हे नाव की; नाव ऐकून संशोधकांनी पण दिली घरी भेट

प्रत्येक माणसाचे एक स्वप्न असते. त्यात आपल्या स्वप्नातले एक घर असावे अशी सर्वांची इच्छा असते. काही ग्रामीण भागामध्ये देवाच्या नावावरून घराचे नाव किंवा काही ठिकाणी आई वडिलांच्या नावावरून नाव ठेवले जाते. काही ठिकाणी तर तर्हेतर्हेचे नाव दिल्याचे पण आढळून आले आहे.

असे सर्व असताना सध्या सातारा मधील एक शेतकरी खूप चर्चेत आला आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या घराला वेगळेच नाव दिले आहे. त्याने त्याच्या घराला जे नाव दिले आहे त्यामुळे त्याचे नाव राज्यात प्रसिद्ध झाले आहे. त्या शेतकऱ्याने त्याच्या घराला ८६०३२ ची कृपा असे नाव दिले आहे.

Loading...

हे नवीन नाव ऐकून अनेक जण चकित झाले आहेत. कारण बऱ्याच जणांना हे नाव नेमके आहे तरी काय हेच अजून कळलेले नाही. ८६०३२ हे एका उसाच्या वाणाचे नाव आहे. जेव्हा राहुरी विद्यापीठातील शेतकऱ्यांना या घडल्या घटनेबद्दल माहिती मिळाली तसे त्यांनी त्या शेतकऱ्याची भेट घेतली आहे.

खटाव तालुक्यातील चोरडी गावच्या बापू आण्णा मिसळ यांनी त्यांच्या बंगल्याला हे नाव दिले आहे. त्यांनी त्यांच्या घराला ८६०३२ हे नाव दिले आहे. तसेच त्याने बंगल्याचा रंग देताना त्यावर उसाचा रंग पण दिला आहे. त्याने या उसाची लागवड केल्यामुळे उत्पन्न वाढल्याचे पण सांगितले आहे.

उसाच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळाले. त्यामुळे मी घराला उसाच्या जातीचे नाव दिल्याचे म्हटले आहे. त्यांच्या बंगल्याच्या नावाची चर्चा सगळीकडे चालू आहे. राहुरी कृषी विद्यापीठातील संशोधकांनी पण त्या शेतकऱ्याची घरी जाऊन भेट घेऊन त्याचा सत्कार केला आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *