
राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वाना ठाऊक आहेच. राज ठाकरे यांच्याकडे श्वानप्रेमाची आवड राज ठाकरेंकडे आली आहे. मागील महिन्यात २९ जूनला राज ठाकरे यांच्याकडे असलेल्या ग्रेट डॅन जातीतील जेम्स नावाच्या कुत्र्याचे दुःखद निधन झाले. ६ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यावर याच जातीच्या कुत्र्याकडून हल्ला झाला होता.
त्या वेळी घडले असे की राज ठाकरे पत्रकार परिषदेत व्यस्त होते. त्याचवेळी शर्मिला ठाकरे कामानिमित्त घराबाहेर जाणार होत्या. घराबाहेर जाण्याच्या आधी त्या त्यांच्या दोन कुत्र्यांना भेटायला गेल्या. त्यावेळी त्यांच्यावर ग्रेट डॅन जातीच्या दोन कुत्र्यांपैकी बॉण्ड नावाच्या कुत्र्याने शर्मिला ठाकरे यांच्यावर हल्ला केला.
हा हल्ला एवढा भयानक होता की त्या वेळी शर्मिला ठाकरे यांच्या चेहऱ्यावर ६५ टाके घालण्यात आले होते. राज ठाकरे त्या वेळी घरी नसल्यामुळे घरातील लोकांनीच त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार चालू करण्यात आले.
दरवेळी शांत असणारा बॉण्ड अचानक एवढा का चिडला हे कळायला पण मार्ग नव्हता. शर्मिला ठाकरे यांच्या चेहऱ्यावर खोल जखमा झाल्या होत्या. ही दोन कुत्रे ठाकरे कुटुंबीयांकडे १० वर्षांपासून होती. त्यांनी त्यावेळी ग्रेट डॅन जातीचे शॉन नावाचे पण कुत्रे आणले होते. राज ठाकरे यांच्या घरी ९ ते १० कुत्र्यांचे कुटुंबीय होते.
ही घटना घडल्यानंतर राज ठाकरे यांच्या घरच्या श्वानांची रवानगी त्यांच्या कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांना पण कुत्र्यांची आवड होती. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मार्शल आणि मार्कोस ग्रेट डॅन नावाची कुत्रे होती. ठाकरे प्राणिमात्रावरील आवड दिसून येते.
बॉण्ड का चिडला याबद्दल बोलताना एक श्वानप्रेमीने म्हटले की, बॉण्डची तपासणी योग्य वेळेवर न झाल्यामुळे त्याने हा हल्ला केला. इतरवेळी हा कुत्रा शांत असतो. अशा वेळी त्याचा आक्रमकपणा दिसून आल्यामुळे सगळीकडूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.