Breaking News
Loading...
Home / बातम्या / शाहिद कपूरचे सावत्र पिता वयाच्या ५२ व्या वर्षी बनले “बाप”

शाहिद कपूरचे सावत्र पिता वयाच्या ५२ व्या वर्षी बनले “बाप”

थांबा थांबा ! बातमीचे टायटल वाचुन गोंधळून जाऊ नका. बॉलिवुडमध्ये प्रेमप्रकरण, लग्न आणि घटस्फोट ही न संपणारी मालिका आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. अभिनेते आणि अभिनेत्रींनी प्रेमप्रकरणातुन लग्न केली आणि त्यानंतर घटस्फोट घेऊन वेगळी झाल्याची बॉलिवुडमध्ये अनेक उदाहरणे सापडतात.

आज आपण असेच एक उदाहरण पाहणार आहोत. त्यासोबतच बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आज ३८ वर्षांचा असताना त्याचे सावत्र वडिल वयाच्या ५२ व्या वर्षी बाप बनल्याची स्टोरीही पाहणार आहोत.

Loading...

नेमका विषय काय आहे ?

विषय असा आहे की, नीलिमा अजीम आणि पंकज कपूर यांनी १९७५ मध्ये लग्न केल्यानंतर त्यांना जो एक मुलगा झाला तो शाहिद कपूर ! १९८४ मध्ये शाहिदच्या मात्यपित्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर शाहिद आपल्या आईसोबत दिल्लीत आजी-आजोबांकडे राहू लागला. १९९० मध्ये शाहीदच्या आईने राजेश खट्टर यांच्याशी लग्न केले. त्यांनाही एक मुलगा झाला त्याचे नाव ईशान खट्टर !

परंतु २००१ मध्ये नीलिमा आणि राजेश यांच्यातही घटस्फोट झाला. २००४ मध्ये निलिमाने परत एकदा रजा अली खान यांच्याशी विवाह केला आणि २००९ मध्ये परत त्यांच्यात घटस्फोट झाला. यातल्या राजेश खट्टर या शाहिद कपूरच्या सावत्र वडिलांनी २००७ मध्ये वंदना संजनानी यांच्याशी लग्न केले होते, त्यांना लग्नाच्या ११-१२ वर्षांनंतर नुकताच एक मुलगा झाला आहे. या अर्थाने शाहिदच्या सावत्र वडिलांना मुलगा झाला आहे.

वयाच्या ५२ व्या वर्षी वडील झाल्यानंतर राजेश खट्टर यांची प्रतिक्रिया काय होती ?

तसं पाहता वडील होण्याचे वय हे सर्वसाधारणपणे २५ ते ४० च्या दरम्यान असते. पण राजेश खट्टर हे वयाच्या ५२ व्या वर्षी वडील बनले आहेत. याबद्दल बोलताना ते म्हणतात, “या वयात बाप बनने खूपच आव्हानात्मक होते. यावेळेस बाप बनने सोपे नव्हते. हा पण मी या नव्या अनुभवामुळे नक्कीच खुश आहे.” राजेश आणि वंदना यांच्या वैवाहिक जीवनातील हा खूपच नाजूक क्षण होता.

सरोगसी, आयव्हीएफ आणि इतर पद्धती वापरुन वंदनाने आई बनण्याचा प्रयत्न केला होता, पण ते अयशस्वी झाले होते. आता मात्र तब्बल १० प्रयत्नानंतर राजेश आणि वंदना पालक बनले आहेत. डॉक्टरांनी त्यांना जुळी मुले असल्याचे सांगितले होते. परंतु एकाचा गर्भातच मृत्यू झाला आणि एकाचा सहीसलामत जन्म झाला. आपल्या या नव्या बाळाचे नाव त्यांनी वनराज कृष्णा असे ठेवले आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *