असा आहे ‘साबुदाण्याचा इतिहास’ ; अशी खाली ‘खिचडीची’ सुरुवात

उपवासाला साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याचे वेफर्स असे समीकरणच तयार झालेले आहे. उपवास असले की साबुदाणा हमखास आठवतोच. साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खीर, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे पापड असे कितीतरी साबुदाण्याचे पदार्थ आपल्या नजरेसमोर आपसूकच येत असतात. आपल्यातील अनेकांना साबुदाण्याच्या रंजक इतिहासाबद्दल माहीत नसेल मात्र साबुदाण्याचा इतिहास अतिशय मजेशीर आहे.
केरळ राज्यातील त्रावणकोरच्या राजवाड्यातील शाही स्वयंपाकघरात पहिल्यांदा साबुदाण्याची खिचडी तयार करण्यात आली होती. साबुदाण्याच्या खिचडी बनविण्यात त्रावणकोरचे राजे विशाखम थिरूनल राजा वर्मा यांचा मोठा वाटा आहे.
एकदा राजे विशाखम शेजारील राज्यांमध्ये प्रवास करत होते. तेव्हा त्यांना शेजारील राज्यांमध्ये मोत्यासारखा साबुदाणा पहिल्यांदाच नजरेस आला. तिथं त्यांना कळलं की एका कॅसावा वनस्पतीपासून ८०० किलो साबुदाणा तयार होतो. विशाखम राजांनी विचार केला की, आपल्या राज्यातील दुष्काळामुळे निर्माण झालेली अन्नाची समस्या यामुळे मिटू शकते.
त्यामुळे त्यांनी देखील कॅसावा रोपं घेतले आणि आपल्या राजवाड्याच्या परिसरात ही रोपं लावली. त्यातून साबुदाण्याची निर्मिती केली. राजवाड्याच्या स्वयंपाक घरात पहिल्यांदा साबुदाणा खाण्याचा पदार्थ म्हणून वापरला गेला. त्यातून खात्री पटल्यानंतर पुन्हा कॅसावा रोपांची लागवड करण्यात आली. राजा वर्मा यांचा हा प्रयोग काही महिन्यांतच यशस्वी झाला.
त्यांनी पुन्हा जेथून रोपं घेतली तेथे भेट दिली आणि पुन्हा काही रोपं घेतली. काही काळातच साबुदाण्याचा वापर प्रत्यक्ष शाही जेवणामध्ये करण्यात आला. अशा पद्धतीने १९व्या शतकात राजा विशाखम यांच्यामुळे भारतीय जेवणामध्ये साबुदाण्याचे पदार्थ आले.
साबुदाण्याचा इतिहास पाश्चात्य साहित्यात असं सांगितला जातो की , टॅपिओका हे झाडं मूळचं दक्षिण अमेरिकेचे आहे . या झाडाचे कंद म्हणजेच मुळापासून साबुदाणा तयार केला जातो . १२२५ मध्ये झाओ रुकोव यांच्या ‘ झू फॅन झीही ‘ या पुस्तकाता साबुदाण्याचा पहिला उल्लेख सापडतो .