Breaking News
Loading...
Home / बातम्या / सत्ताधारी महाविकास आघाडीबरोबरच स्वपक्षीयांना देखील राणेंचे खडेबोल; नारायण राणे झाले आक्रमक

सत्ताधारी महाविकास आघाडीबरोबरच स्वपक्षीयांना देखील राणेंचे खडेबोल; नारायण राणे झाले आक्रमक

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. कोकणात आलेल्या महापुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणचा दौरा केला होता. त्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूणचा दौरा केला. यात नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत बोलत असताना ” सीएम गेला उडत ” असे वक्तव्य केले.

दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांवर टीका करणे हे उचित आहे. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेले वक्तव्य चुकीचे आहे असे अनेकांनी म्हटले आहे. विरोधी पक्षच नाही तर नारायण राणे यांनी स्वपक्षियांवर बोलताना देखील नियंत्रण सोडले आहे. विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी उद्देशून ” थांब रे मध्ये बोलू नको ” असे वक्तव्य केले आहे.

Loading...

काय म्हणाले नेमके नारायण राणे तर अधिकाऱ्यांना उद्देशून राणे म्हणाले की, तुम्हाला सोडू का त्या मॉबमध्ये सोडू का आता? प्रवीण दरेकरांच्या दिशेने हात करत थांब रे मध्ये बोलू नको असे म्हणाले. पुन्हा अधिकाऱ्यांना उद्देशून मॉबमध्ये सोडून येऊ? काय चेष्टा समजली? एवढी लोकं रडत आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत मग, त्यांचं आयुष्य उद्धवस्त झालं आणि तुम्ही हसताय . दात काढताय असं देखील राणे म्हणाले. यावेळी अधिकाऱ्याने हसत नाही सर, मी पहिल्यापासूनच इथे काम करत आहे असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

नारायण राणे यांनी आतापर्यंत जवळपास तीन पक्ष बदलले आहे आणि तिन्ही वेळेस त्यांचा अतिआक्रमकपणा या गोष्टींना कारणीभूत ठरला आहे. नारायण राणे हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा सोपविल्यानंतर नारायण राणे यांनी मोठे बंड घडवून आणले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्रीपदाच्या आशेने ते काँग्रेसमध्ये गेले खरे मात्र स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या राजकीय वजनामुळे नेहमीच त्यांना डावलण्यात आले.

त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि शिवसेनवर टीकेची झोड सुरु ठेवली. शिवसेनेला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने नारायण राणे यांना आपल्यात सामावून घेतले. आता ते केंद्रीय मंत्रिपदावर विराजमान आहेत. मात्र त्यांच्या आक्रमकपणाचा आता भारतीय जनता पक्षाला परिचय आला आहे.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *