Breaking News
Loading...
Home / बातम्या / रितेश देशमुखच्या शेतजमिनीवर खरंच ४ कोटी ७० लाखांचं कर्ज आहे का? वाचा

रितेश देशमुखच्या शेतजमिनीवर खरंच ४ कोटी ७० लाखांचं कर्ज आहे का? वाचा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वाधीक चर्चा होत आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची. कारण प्रचाराच्या काळात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची आश्वासन दिले होते. त्यामुळे आता सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडी हि संपूर्ण कर्जमाफी करेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी बैठका देखील चालू केल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीसाठी एक रोडमॅप तयार करण्यात येत आहे. राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी ३५८०० कोटींची आवश्यकता आहे. हि कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकार केंद्र शासनाची मदत न घेता देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

Loading...

दरम्यान याच कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर सध्या रितेश देशमुख यांच्या ७/१२ चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल मेसेजमध्ये माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या मुलांच्या शेतजमीनाचा ७/१२ आहे. या उताऱ्यावरील कर्जाचा बोजा दाखवून रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांना ट्रोल करण्यात येत आहे.

शेतकरी कर्जमाफीचा फायदा देशमुख बंधूना होणार असल्याचे सांगून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अमित देशमुख व रितेश देशमुख यांना लातूर तालुक्यातील सारसा येथील ११ एकर जमिनीवर चार कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज दिल्याची कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली.

या कागद्पत्रविषयी स्वतः रितेश देशमुखने खुलासा केला आहे. रितेश देशमुखने ट्विट करून याविषयी माहिती दिली आहे. रितेश देशमुख म्हणाला ‘मी व अमित देशमुखने कोणते कर्ज घेतलेच नाही’. सामाजिक कार्यकर्त्या मधू किश्वर यांनीही देशमुख कुटुंबीयांच्या शेतजमिनीसंदर्भातील ही कागदपत्रे ट्विट करुन रितेश देशमुखला लक्ष्य केलं होतं. रितेशने मधू किश्वर यांना टॅग करुन या कागदपत्रांसंदर्भात स्पष्टीकरण दिलंय.

रितेशने ट्विट करून स्पष्ट केले आहे कि हि कागदपत्रे खोटी असून ती चुकीच्या उद्देशाने व्हायरल केली आहेत. कृपया अशा प्रकारच्या अफवा पसरवू नका, असेही रितेशने म्हटले होते. दरम्यान, रितेशच्या ट्विटनंतर मधू यांनी ते फोटो आणि ट्विट डिलीट केलंय.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *