सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बला त्काराचा आरोप झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर बला त्काराचा आरोप झाल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपले स्पष्टीकरण दिले होते. यावेळी त्यांनी तक्रारदार महिला रेणू शर्मा यांच्याकडून मला ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप केला होता. मुंडे यांच्या आरोपांचे रेणू शर्मा यांच्या वकिलांनी खंडन केले आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी त्यांची बाजू माझ्यासोर माडंली आहे. मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन धनंजय मुंडे यांच्यावर निर्णय घेईल अशी भूमिका राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
दरम्यान सुरुवातीला ओशिवरा पोलिसांनी आपली लेखी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप रेणू शर्मा यांनी केला होता. धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 जानेवारीला तक्रार केली. याप्रकरणी 11 जानेवारीला रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. रेणू शर्माच्या आरोपांनुसार 2006 पासून अत्याचार सुरु असल्याचा दावा तिने केला आहे.
रेणू शर्माच्या वकिलांचे भाजप कनेक्शन समोर-
रेणु शर्मा या महिलेचे वकील आहेत अॅड. रमेश त्रिपाठी. रमेश त्रिपाठी यांचं भाजप कनेक्शन समोर आलं आहे. रेणूचे वकील रमेश त्रिपाठी हे भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय सचिव असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर तसा उल्लेख असल्याचे दिसून येत आहे. शिवाय रमेश त्रिपाठी स्वतःच एका विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपी असल्याची माहिती आता समोर येत आहे.
मुंडे प्रकरणात आज नवे ट्विस्ट-
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. मुंडे यांच्यावर लैं गिक शो षणाचे आरोप करत पोलीस तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा हिच्याविरोधात माजी आमदार व सध्याचे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे.
‘रेणू शर्मा ही ‘हनी ट्रॅप’ लावून प्रतिष्ठित व्यक्तींना ब्लॅकमेल करणारी महिला आहे,’ असं हेगडे यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. हेगडे यांच्या पाठोपाठ मनसेचे मनीष धुरी यांनी देखील रेणू शर्माने हनी ट्रॅप मध्ये अडकवल्याचे सांगितले आहे.