Breaking News
Home / बातम्या / ‘या’ कारणामुळे एकनाथ खडसे यांची सून खासदार रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार..

‘या’ कारणामुळे एकनाथ खडसे यांची सून खासदार रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार..

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे मागील ४ वर्षांपासून भाजपमध्ये नाराज होते. मागील २ वर्षात तर त्यांनी अनेकदा आपल्या मनातील खडखड उघडपणे बोलून दाखवली होती. आज अखेर त्यांनी भाजपला रामराम ठोकत मोठा धक्का दिला आहे. खडसे हे भाजपचे जेष्ठ नेते होते. त्यांनी मागील चाळीस वर्षात भाजपला राज्यात चांगले दिवस आणण्यात मोठे योगदान दिले.

एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठी दिल्याने भाजपने चिंतन करावे लागेल अशी प्रतिक्रिया भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांचा भाजपला राज्यात वाढवण्यात मोठा वाटा आहे. त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

दरम्यान एकनाथ खडसे हे २३ तारखेला शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्यासोबत अनेक आमदार खासदार राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्याने खळबळ उडाली होती.

आपल्यासोबत एकही आमदार आणि खासदार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नसल्याचे खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. सध्या कोरोनाच्या संकटात निवडणुका आणि राजकारण नको म्हणून इतर आमदारांना टप्प्याटप्याने प्रवेश देणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे घोषित झाल्यानंतर त्यांच्यासोबत कोण कोण प्रवेश करणार याची उत्सुकता लागली आहे. एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र त्या भाजपमध्येच राहणार असल्याचे खडसे यांनी जाहीर केलं आहे.

‘या’ कारणामुळे खासदार रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार-

रक्षा खडसे या भाजपच्या रावेरच्या खासदार आहेत. एकनाथ खडसे यांनी वयक्तिक करणारी भाजपला रामराम ठोकला आहे. रक्षा खडसे यांना मात्र भाजपमध्ये कुठलाही त्रास नाही. आणि लोकांनी त्यांना भाजपच्या खासदार म्हणून सेवा करण्यासाठी निवडून दिलं आहे. त्यामुळे लोकांची सेवा करण्यासाठी मी भाजपमध्येच राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या मात्र खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या फेसबूक पेजवर प्रोफाइल फोटो बदलून राष्ट्रवादीत जाणार असल्याचे एकप्रकारे जाहीर केले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *