Breaking News
Home / प्रेरणादायी / दररोज ५.६ करोड कमवणारे राकेश झुनझुनवाला कसे झाले शेअर मार्केटचे बिग बुल…

दररोज ५.६ करोड कमवणारे राकेश झुनझुनवाला कसे झाले शेअर मार्केटचे बिग बुल…

हो आपण हेडर बरोबर वाचले दररोज ५.६ करोड एवढी कमाई राकेश झुनझूनवाला यांची आहे. परंतु त्यांनी हा प्रवास कसा केला याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. हर्षद मेहता यांच्या नंतर एवढा पैसा कमाविणारे राकेश झूनझूनवाला आहे. जर तुम्हाला स्टाॅक मार्केटची कल्पना असेल तर तुम्हाला राकेश झूनझूनवाला याची देखील नक्की माहिती आहे. माहिती जरी नसली तरी scam १९९२ हि वेब सिरीज आपण बघितल्यावर आपणास हि कल्पना येणार.

जर तुम्हाला या सिरिज मधील पात्र कोण आहे याची कल्पना नसेल तर आपल्यासाठी खाली आम्ही एक फोटो देत आहो जे बघून आपली कल्पना क्लियर होईल कि या सिरीज मध्ये कोण कुठले पत्र आहे.

राकेश झूनझूनवाला हे भारतातील सर्वात यशस्वी इक्विटी मध्ये गुंतवणूक करणारे व्यक्ती आहे. हर्षद मेहता नंतर राकेश झूनझूनवाला यांना बिग बुल म्हणून ओळखल्या जाते. त्यांना भारताचा वारेन बफेट देखील म्हणतात.

राकेशचे वडील इनकम टैक्स ऑफिसर होते आणि स्टाॅक मार्केट मध्ये काम करत होते. मध्यमवर्गीय कुटुंबातून राकेश झुनझुनवाला यांनी हि मोठी भरारी घेतली आहे. बॉम्बे स्टाॅक एक्स्चेंज मध्ये जेव्हा त्यांनी कामाला सुरवात केली होती, मार्केट १५० वर होते आज मार्केट ४०,००० वर आहे. १९८६ ते १९८९ मध्ये त्यांनी स्टाॅक मार्केट मध्ये २५ लाख रुपये कमाई केली.

राधाकृष्ण दमाणी यांच्या तालमीत राकेश झूनझून वाला तयार झाले. १९९२ साली स्टाॅक मार्केटिंग मध्ये त्यांनी बराच पैसा कमविला. हर्षद मेहता यांची जागा राकेश झूनझूनवाला यांनी लवकरच भरून काढली. त्यांनी Titan, CRISIL, Sesa Goa, Praj Industries, Aurobindo Pharma आणि NCC मध्ये गुंतवणूक केली आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक झाले.

सध्या राकेश झूनझून वाला स्वतःची Rare Enterprises नावाने फर्म चालवितात. २०१७ मध्ये त्यांनी टायटनच्या एका ट्रेडिंग सेशन मध्ये तब्बल ८७५ कोटी रुपये कमविले होते. २३ मार्चच्या बीजनेस टुडेच्या माहिती नुसार ५.६ कोटी रुपये रोज कमवितात. लांब वेळे करिता स्टाॅक ठेवणे हि पद्धत वापरून ते पैसे कमवितात.

भविष्यात जुलै २०२१ आपली २५% संपत्ती दान करायचा त्यांनी ठरविले आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *