
राजकारणातील सगळ्यात चर्चेत राहणारे नाव म्हणून राज ठाकरे यांना ओळखले जाते. राज ठाकरे यांचे त्यांच्या घरच्या श्वानांवर असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. राज ठाकरे यांच्या घरी तीन श्वान असल्याचे आपणा सर्वाना माहित असेलच. राज ठाकरे यांच्या आवडत्या श्वान जेम्ससोबतचे फोटो सर्वानी पहिले असतीलच.
राज ठाकरे यांच्या आवडत्या जेम्स श्वानाचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी त्यांच्या आवडत्या श्वानाचे निधन झाले आहे. जेम्सच्या निधनाने संपूर्ण ठाकरे कुटुंबीय दुःखाच्या सागरात लोटले आहे.
ग्रेट डेन जमातीतील असणाऱ्या जेम्सचे वय झाल्यामुळे निधन झाले आहे. जेम्सचे राज ठाकरेंसोबत ठाकरेंसोबत अनेक फोटो असल्याचे दिसून आले आहे. वाढत्या वयामुळे जेम्सचे निधन झाले आहे. यावेळी राज ठाकरे दुःखात बुडाल्याचे दिसून आले आहे.
ठाकरे कुटुंबीयांनी जेम्सच्या अंत्यविधीची तयारी पण केली होती. जेम्सच्या अंत्ययात्रेसाठी हार, फुले आणि शाल वाहण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून राज ठाकरे यांच्याकडे जेम्स आणि बॉण्ड नावाचे दोन श्वान आहेत. हे दोन्ही श्वान डॅन जातीचे असल्याचेसांगण्यात आले आहे.
राज ठाकरे यांचे त्यांच्या श्वानावर अतोनात प्रेम असल्याचे दिसून आले आहे. ते त्यांच्या श्वानांची काळजी घेत असल्याचे पण अनेक वेळा समोर आले आहे. त्यांनी दोन श्वानांच्या प्रशिक्षणासाठी एक ट्रेनर पण ठेवला होता. राज ठाकरे यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलाचे पण श्वानावर प्रेम असल्याचे दिसून आले आहे.