Breaking News
Home / बातम्या / पोलिसांनी सिनेमा स्टाईल शोधून काढल्या बारबाला, १५ तासांच्या प्रयत्नानंतर आलं यश! बघा व्हिडीओ..

पोलिसांनी सिनेमा स्टाईल शोधून काढल्या बारबाला, १५ तासांच्या प्रयत्नानंतर आलं यश! बघा व्हिडीओ..

मुंबईतील अंधेरीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी बारवर छापा टाकून 17 बारबालांची सुटका केली आहे. मेकअप रूममधील एका गुप्त खोलीत मुली लपून बसल्या होत्या. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना 15 तास लागले. महिलांना गुप्त खोलीत खाण्यापिण्याची सोय होती. एसी पण होता.

अंधेरीतील एका बारमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती. बारमध्ये खूप गर्दी असते. बार्बेक्यूमुळे बार रात्रभर सुरू असतो. याबाबत स्थानिक पोलिसांकडे कोणतीही माहिती नसली तरी समाजसेवा शाखेकडे अशा तक्रारी आल्या. यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री बारवर छापा टाकला.

छाप्यात पोलिसांना एकही बारबाला सापडली नाही. यानंतर पोलिसांनी बाथरूम, स्टोरेज रूम, किचन आणि इतर ठिकाणी झडती घेतली. पण तिथेही एकही बारबाला सापडली नाही. पोलिसांनी बार कर्मचाऱ्यांची अनेक तास चौकशी केली. पण काही झाले नाही. सकाळी समाजसेवा शाखेचे डीसीपी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पुन्हा शोध सुरू झाला.

मेकअप रूममध्ये पोलिसांना संशयास्पद आरसा आढळला. पोलिसांनी हातोड्याने काच फोडली. त्याच्या मागे एक दरवाजा होता. तो रिमोटनं कंट्रोल व्हायचा. पोलिसांनी दरवाजा उघडताच एक एक करून बारबाला बाहेर आल्या. सीक्रेट रूममध्ये एकूण 17 बारबाला होत्या. पोलिसांनी 20 जणांविरोधात तक्रार नोंदवून बार सील केला आहे.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published.