Breaking News
Home / मनोरंजन / ..म्हणून पुण्यातील त्या घट स्फो ट सोहळ्याला करण्यात आली होती जय्यत तयारी! समोर आले रहस्य

..म्हणून पुण्यातील त्या घट स्फो ट सोहळ्याला करण्यात आली होती जय्यत तयारी! समोर आले रहस्य

मागील आठवडाभरात एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये एक कमान आपल्याला दिसते ज्यावर घट स्फो ट सोहळा असे लिहिलेले आहे तर नवरा आणि बायकोचे आडनाव देखील लिहिलेले आहेत. हा फोटो बघून सर्वाना प्रश्न पडला होता कि हि भानगड नेमकी काय आहे.

घट स्फो ट सोहळा तो देखील एवढ्या धुमधडाक्यात. त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला होता या सोहळ्याबद्दल. सोशल मीडियावर या फोटोची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आता मात्र या घट स्फो ट सोहळ्याचे खरे कारण समोर आले आहे. याच र हस्य आता उलगडले असून जाणून घेऊया काय आहे ते र हस्य..

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो खऱ्या एखाद्या सोहळ्याचा नसून तो चित्रपटातील आहे. मंगलाष्टक रिटर्न या मराठी चित्रपटाचे शूटिंग पुण्यात सुरु आहे. त्या शूटिंगचा भाग हा फोटो होता जो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

प्रसाद ओक,आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, वृषभ शहा, अभिनेत्री श्वेता खरात, प्रसन्ना केतकर, शीतल अहिरराव अभिनेता सुनील गोडबोले, कमलेश सावंत, समीर पौलस्ते अभिनेत्री प्राजक्ता नेवळे, सोनल पवार,भक्ती चव्हाण, शीतल ओस्वाल यांच्या भूमिका या चित्रपटात बघायला मिळणार आहेत.

लॉकडाऊन मध्ये संपूर्ण चित्रपटसृष्टी बंद होती. आता मात्र चित्रीकरणाला सुरुवात झाली असून मंगलाष्टक रिटर्न चित्रपट देखील सध्या चित्रित होत आहे. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा चित्रपट असून एका नव्या कोऱ्या विषयाचा आणि कोड्यात टाकणारा दमदार विषय घेऊन हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

हिंजवडी पुणे येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच घटस्फो ट सोहळा असे नाव असलेल्या कमानीचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे. निर्माता वीरकुमार शहा यांचे ‘शारदा प्रॉडक्शन’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *