बातम्यामनोरंजन

सलमानच्या बहिणीला घटस्फोट देऊन नवरा करतोय या अभिनेत्रीसोबत मजा

बॉलिवूड सेलिब्रिटींची जितकी प्रेमप्रकरणे आहेत, तितकेच त्यांच्या संसारातील काडीमोड देखील आहेत. लग्न करणे आणि काही काळानंतर घटस्फोट घेणे हा बॉलिवूड मधील तसा जुनाच ट्रेंड आहे. ज्या धुमधडाक्यात ते लग्न करतात तितक्याच समजूतदारीने नात्यांमध्ये काही खटकलं की वेगळे होतात.

विशेष म्हणजे घटस्फोट घेतल्यानंतर काही काळातच दुसरीकडे यांचे प्रेमप्रकरण सुरु होते आणि ही प्रेमप्रकरण, लग्न आणि घटस्फोटाची मालिका सुरू राहते. बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खानच्या बहिणीच्या बाबतीत घडलेला किस्सा बघणार आहोत.

कोण आहे सलमानच्या बहिणीचा पती ?

वास्तविक पाहता सलमानला सख्खी बहीण नाही. परंतु सलमानने श्वेता रोहिरा नावाच्या अभिनेत्रीला आपली बहीण मानले आहे. श्वेताने २०१४ मध्ये पुलकित सम्राट याच्याशी लग्न केले होते. पुलकित हा तोच ज्याने “क्यों की सांस भी कभी बहू थी” मालिकेत लक्ष विराणी याची भूमिका केली होती. पुलकितने बिट्टू बॉस, फुकरे अशा चित्रपटात देखील काम केले आहे. श्वेता आणि पुलकितचा संसार दीर्घकाळ टिकला नाही, वर्षभरातच त्यांनी घटस्फोट घेतला.

सध्या या अभिनेत्रीसोबत सुरु आहे पुलकितचे प्रेमप्रकरण

सलमानच्या बहिणीला घटस्फोट दिल्यानंतर पुलकितचे नाव काही काळ यामी गौतमसोबत चर्चेत होते. एका प्रसंगात श्वेताने यामीला थप्पड मारल्याचाही प्रसंग घडला होता. सलमाननेही पुलकितला यामीपासून दूर राहण्याचा दम दिला होता. या वादांमुळे शेवटी त्यांचा घटस्फोट झाला.

दरम्यान “हाऊसफुल ४” चित्रपटातील क्रिती खरबंदा आणि पुलकित एकमेकांच्या प्रेमात पडल्याची खबर आहे. “वीरे दी वेडिंग” चित्रपटात दोघे एकत्र आले होते, तेव्हापासून त्यांच्यात जवळीक वाढली. स्वतः क्रितीने त्यांच्यातील नात्याचा खुलासा केला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button