Breaking News
Home / बातम्या / एकेकाळी शार्पशूटर असलेला हा पोलीस अधिकारी आज भीक मागतोय, कारण ऐकून थक्क व्हाल..

एकेकाळी शार्पशूटर असलेला हा पोलीस अधिकारी आज भीक मागतोय, कारण ऐकून थक्क व्हाल..

मध्य प्रदेश मधल्या ग्वालियर मध्ये १० नोव्हेंबरला पोटनिवडणुकीच्या मतगणना सुरु होती. त्यावेळी डीएसपी रत्नेश तोमर ड्युटीवर होते. ते संध्याकाळी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी रस्त्यावर एक आवाज ऐकून ते थक्क झाले. एका भिकाऱ्याने त्यांना त्यांचे नाव घेऊन पुकारले. डीएसपी स्तब्ध झाले. त्या भिकाऱ्याजवळ जाऊन बघितले तर ते सुन्न झाले. तो भिकारी दुसरा तिसरा कोणी नव्हता तर त्यांचा एकेकाळचा सहकारी पोलीस उपनिरीक्षक मनीष मिश्रा होता.

जबरदस्त निशाणेबाज असलेले मिश्रा बनले भिकारी-

सब इन्स्पेकर मनीष मिश्रा हे मागील १० वर्षांपासून रोडवर असेच वणवण भटकत आहेत. मिश्रा हे १९९९ च्या बॅचचे एक अचूक निशाणेबाज होते. ते ठाणेदार देखील राहिले आहेत. ते एक चांगले अधिकारी म्हणून सर्वाना परिचित होते. एका चांगल्या पोलीस अधीकार्याची अशी अवस्था होईल हे कोणी स्वप्नात देखील बघितले नसेल.

डीएसपी विजय रत्नेश तोमर आणि डीएसपी विजय भदौरिया यांनी बराच वेळ मिश्रा यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि मागच्या गोष्टी जाणून घेतल्या. त्यांनी मिश्रा यांना सोबत घेऊन जाण्याची विनंती केली पण ते तयार नाही झाले. अखेर त्यांना NGO च्या मदतीने आश्रमात भरती केले.

अखेर मनीष मिश्रा यांचे हे हाल का झाले?

मनीष मिश्रा यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्ती पोलीस अधिकारी राहिले आहेत. त्यांचे भाऊ ट्राफिक इंस्पेक्टर आहेत तर वडील आणि काका हे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहिले आहेत. तर बहीण देखील एका दूतावासात नोकरीला आहे.

मनीष हे स्वतः २००५ मध्ये नोकरीला होते. शेवटी ते दतिया जिल्ह्यात सेवेत होते. पण त्याच दरम्यान त्यांचं मानसिक आरोग्य बिघडले. ते सुरुवातीला ५ वर्ष घरीच राहिले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ज्या सेंटरमध्ये आणि आश्रमात भरती करण्यात आले तिथून ते पळून गेले. त्यांच्या पत्नीने देखील त्यांना घटस्फोट दिला होता. पत्नी देखील न्यायालयीन सेवेत होती. त्याच्य कुटुंबाच्या मते त्यांना घटस्फोटाची माहितीच नव्हती.

दरम्यान एवढ्या चांगल्या अधिकाऱ्यावर भीक मागून जीवन जगण्याची वेळ आल्याने लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. एका अधिकाऱ्याला मानसिक आरोग्यामुळे असे रस्त्यावर जगावे लागतेय पण याची खबर ना घरच्यांना मिळाली न प्रशासनाला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *