Breaking News
Loading...
Home / नवीन खासरे / पृथ्वीवरील नरकाच्या दरवाजाबद्दल आपल्याला माहित आहे का? नसल्यास ‘हे’ नक्की वाचा;

पृथ्वीवरील नरकाच्या दरवाजाबद्दल आपल्याला माहित आहे का? नसल्यास ‘हे’ नक्की वाचा;

जगात दैवी शक्ती आणि संस्कृतीला विशेष महत्व दिले जाते. निसर्गसृष्टीच्या उदयापासून तर आधुनिक जगतापर्यंतच्या प्रवासात अनेक चमत्कारिक गोष्टी घडलेल्या आहेत हे अनेक लिखित गोष्टींमधून तसेच विविध वास्तूंवर केलेल्या लिखाणामुळे, कोरीवकामामुळे, उत्खननात मिळालेल्या पुराव्यांवरून अनेकदा सिद्ध झाले आहे.

सर्वसामान्य माणूस नेहमी स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना करत असतो. स्वर्ग हा किती सुंदर आहे आणि नर्क हा किती त्रासदायी आहे हे आपण अनेकदा लोकांच्या कल्पनेवरून अथवा काल्पनिक कथांमधून वाचले असेल. स्वर्गात जात असताना सोनेरी गेटमधून आपलं एकदम आदरपूर्वक स्वागत केलं जाईल असा अनेकजण विचार करत असतात.

Loading...

नरकाबद्दल जेव्हा लोक विचार करतात तेव्हा एखादी अंधारी गुहा, दरी जेथे आग निघते आहे असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. सोशल मीडियावर सध्या एक ‘डोर टू हेल’ चे फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो तुर्कमेनिस्तानचे आहेत. जेथे एका खड्डयात मोठ्या पप्रमाणात आग लागलेली आहे. तुर्कमेनिस्तानची राजधानी अशगाबातपासून २६० किलोमीटर दूर कारकूम वाळवंटातील दरवेज या गावातील खड्ड्यात गेल्या ४७ वर्षांपासून आग लागलेली आहे.

या जागेला जगातील सर्वात मोठे नैसर्गिक गॅसचे ठिकाण समजले जाते. १९७१ मध्ये सोव्हियत संघाच्या वैज्ञानिकांनी मिथेन गॅस जमा करण्यासाठी या ठिकाणी ड्रिलींग केले होते. एक दिवशी येथे स्फोट झाला आणि त्यानंतर ‘नरकाचा दरवाजा’ नावाने ओळ्खल्या जाणाऱ्या या जागेवर आग लागली होती.

वैज्ञानिकांनी सुरुवातील मिथेन गॅस पसरू नये म्हणून खड्ड्यात आग लावली होती. वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार आग दोन आठवड्यात थांबायला हवी होती. मात्र तेव्हापासून आजपर्यंत आग सुरूच आहे.

Loading...

ज्या खड्ड्यात आग लागलेली आहे तो खड्डा सुमारे २२९ फूट रुंद आणि ६५ फूट खोल आहे. पर्यटकांसाठी ही जागा सध्या आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. अनेक ठिकाणांहून या ‘नरकाच्या दरवाजाला’ बघण्यासाठी लोक गर्दी करतात आणि खड्ड्यासोबत फोटो देखील काढतात.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *