Breaking News
Home / बातम्या / या हिंदू व्यक्तीकडे सोपवण्यात आली आहे अयोध्येत बनत असलेल्या मशिदीची जबाबदारी!

या हिंदू व्यक्तीकडे सोपवण्यात आली आहे अयोध्येत बनत असलेल्या मशिदीची जबाबदारी!

उत्तर प्रदेशातील धन्नीपूर मध्ये बाबरी मशिदीच्या वैकल्पिक निर्माणासाठी यूपी सरकारने पाच एकर जमीन दिली आहे. या जमिनीवर धन्नीपुर मस्जिद कॉम्प्लेक्स बनवण्यात येणार आहे. ज्यामध्ये म्युझिअम, कम्युनिटी किचन आणि लायब्ररी सारख्या गोष्टी बनवण्यात येणार आहेत. या संपूर्ण कार्याची जबाबदारी एका हिंदू व्यक्तीवर देण्यात आली आहे.

या मशिदीची जबाबदारी देण्यात आली आहे प्रोफेसर पुष्पेश पंत यांना. प्रोफेसर पुष्पेश पंत हे भारतातील एक नावाजलेले आणि सन्मानित शिक्षक आहेत. शिवाय ते फूड एक्सपर्ट आणि इतिहासकार देखील आहेत. ते दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे प्रोफेसर आणि प्रमुख देखील राहिले आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधावर अनेक लेख आणि माहिती लिहिली आहे.

प्रोफेसर पुष्पेश पंत यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिले आहेत. त्यांनी २०११ मध्ये लिहिलेलं इंडिया: द कुकबुक हे पुस्तक खूप गाजलं होतं. या पुस्तकाला न्यूयॉर्क टाइम्सने २०११ चं सर्वोत्कृष्ट कुकबुक संबोधलं होतं. त्यांनी फूड एक्सपर्ट म्हणून अनेक शो मध्ये देखील भाग घेतला आहे.

प्रोफेसर पुष्पेश पंत यांचे योगदान बघून त्यांना २०१६ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या खांद्यावर आता हि मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ते आता या मशिदीत बनणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बनत असलेल्या या कम्युनिटी किचन मध्ये ३६५ प्रकारचे व्हेज आणि नॉन व्हेज मेनू असणार आहेत.

या मशिदीत कम्युनिटी किचनमध्ये गरिबांना कमी किमतीत जेवण पुरवले जाणार आहे. इथे बनत असलेल्या मशिदीला बाबरी मस्जिद हे नाव दिले जाणार नाहीये. तर या मशिदीला धन्नीपुर मस्जिद नावाने ओळखले जाणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *