Breaking News
Home / नवीन खासरे / शिक्षा भोगत असलेले कैदी कारागृहात काय करतात ?

शिक्षा भोगत असलेले कैदी कारागृहात काय करतात ?

एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेले व्यक्ती गुन्हेगार होतो. आणि कोर्टाच्या निर्णयानुसार त्याला शिक्षा दिली जाते आणि त्याला हि शिक्षा कारागृहात पूर्ण करावी लागते. कारागृहच्या चार भिंतीच्या मध्ये त्याला आपला शिक्षेचा काळ पूर्ण करावा लागतो. परंतु या कारागृहात वेळ कसा घालविला जातो हे आपणास माहिती आहे का ?

कारागृहात कैद्याचे पुर्नवसन केले जाते त्यामुळे तो परत या मार्गावर वळला नाही पाहिजे यासाठी पुनर्वसनाकडे भर दिली जाते. कैदी शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर त्याला मानाने जगता यावे स्वतःचा व्यवसाय करता यावा या करिता हि पुनर्वसन केले जाते. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाते. या मध्ये लघु उद्योग, बेकरी उद्योग इत्यादी प्रशिक्षण त्यांना दिले जाते.

येरवाडा कारागृहात तर खुले कारागृह आहे त्यामध्ये पाच वर्ष शिक्षा पूर्ण झालेले कैदी ठेवले जातात. खुल्या कारागृहात कैदी मोकळे असतात. ते येथे शेती, रंगकाम, हातमागावर काम करतात. तुरुंगाच्या हातमागवर दररोज 5000 कपडे तयार केले जातात. येथे तयार झालेले कापड विक्रीसाठीही उपलब्ध असते, अनेक चित्रपटांमध्येही त्यांचा वापर झाला आहे.

कारागृहात दिवस लवकरच सुरु होतो. सकाळी रोज कैद्याचा पुकारा (हजेरी) पासून या दिवसाची सुरवात होते. प्रत्येक राज्यात कैद्यावर खर्च केल्या जातो. भारतात ५२ रुपये एका कैद्यावर खर्च केल्या जातो. सकाळी ७ वाजता चहा, दुपारी १२ वाजता जेवण आणि सायंकाळी ५ वाजता रात्रीचे जेवण मिळते. या जेवणात मसाला वगैरे जास्त वापरल्या जात नाही.

जेल मधील कैनटीन मधून आपण आवश्यक वस्तू देखील खरेदी करू शकतात. या साठी कुपनचा वापर केला जातो. २००० रुपयाचे जास्तीत जास्त कुपन आपण खरेदी करू शकता. कारागृहात आपण आपले शिक्षण देखील पूर्ण करू शकता. मुक्त विद्यापीठातून हे शिक्षण पूर्ण करू शकता. कारागृहात काम करून आपण पैसे देखील कमवू शकता. २० रुपये प्रती दिन प्रमाणे आपणास इथे पगार देखील मिळतो.

आपल्याला वरील माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *