Breaking News
Loading...
Home / नवीन खासरे / फक्त प्रौढांसाठी असणाऱ्या चित्रपटांच्या पडद्यामागे आहे ‘हे’ वास्तव

फक्त प्रौढांसाठी असणाऱ्या चित्रपटांच्या पडद्यामागे आहे ‘हे’ वास्तव

जगात सर्वाधिक चित्रपट बॉलिवूडमध्ये बनवले जातात, पण यामध्ये त्याच चित्रपटांची गिनती केली जाते, जे चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र घेऊन पडद्यावर झळकतात. असे बरेच चित्रपट असतात जे सेन्सॉर बोर्डाच्या दाराजवळ जात नाहीत. सहसा त्यांना बी किंवा सी ग्रेड चित्रपट म्हणतात. या चित्रपटांना सॉफ्ट पॉर्नचा दर्जा दिला जातो. सिनेमागृहात जाऊन हे चित्रपट पाहणारे प्रेक्षक या चित्रपटांशी निगडित लोकांकडे खूप तिरस्काराच्या नजरेने पाहतात.

किती येतो खर्च आणि किती मिळते उत्पन्न ?

Loading...

दीवाना चित्रपटात शाहरुख खानच्या मित्राची भूमिका साकारणारा तिलक बाबा आज फक्त प्रौढांसाठीच्या चित्रपटांमधील मोठे नाव आहे. तो स्वतःच त्याच्या चित्रपटांचा दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि नायक म्हणून काम करतो. त्याचा दावा आहे की या कामातून त्याला महिन्याला २ लाखांचा नफा मिळतो.

सहसा बी-ग्रेड चित्रपटाचे शूटिंग चार दिवसांत पूर्ण होते. एक चित्रपट बनवण्यासाठी साधारणपणे १० ते १२ लाखांचा खर्च येतो आणि एका चित्रपटातून जवळपास ५ लाखांचा नफा मिळतो. हा नफा एकदम नाही तर हप्त्यांमध्ये मिळतो, कारण संपूर्ण देशात हे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत नाहीत.

परिस्थितीने हतबल मुली बनतात अभिनेत्री

या चित्रपटांमध्ये काम करणार्‍या बहुतेक अभिनेत्री त्यांच्या आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीतुन तिथपर्यंत पोहोचतात, तर काही अभिनेत्री पैशांसाठीही या चित्रपटांच्या सेटवर जातात. कामाच्या शोधात अमरावतीहून मुंबईला आलेल्या तन्नूला सुद्धा अनेक दिवस स्टेशनवर घालवावे लागले.

२००५ मध्ये तिला बी-ग्रेड चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. आता ती बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसते आणि प्रत्येक चित्रपटासाठी ती ६०००० रुपये घेते. २० वर्षीय फिजा खान ही देखील या इंडस्ट्रीमध्ये काम करते, जिला एक दिवस या इंडस्ट्रीची सर्वात मोठी अभिनेत्री व्हायचं आहे. पहिली पायरी म्हणून फिजाने बी-ग्रेड चित्रपटांच्या क्षेत्रात पाय ठेवला आहे.

अस्तित्वाची लढाई लढत आहेत ते चित्रपट

जसजसा पडद्यावरच्या चित्रपटांचा ट्रेंड कमी होत चालला आहे, तसतसे बी-ग्रेड चित्रपट आपले अस्तित्व टिकवण्याचे मार्गही शोधात आहेत. बी-ग्रेड चित्रपटांनी सिनेमहॉलच्या पडद्यावरुन युट्यूबवरच्या स्क्रीनवर आपली पावले टाकायला सुरुवात केली आहे.

आज सुमारे ३०० YouTube चॅनेल अशा चित्रपटांशी संबंधित सामग्री अपलोड करते. यूट्यूब या निर्मात्यांना साधारणपणे २ ते ३ लाख रुपयांचा नफा मिळतो. आपण त्यांना काहीही नाव द्या, समाजातील मागणी आणि पुरवठा सिद्धांताच्या आधारेच ते कार्य करत आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *