आरोग्य

बनावट असणारे पनीर ओळखा ‘असे’ ; ‘या’ आहेत महत्वाच्या टिप्स

सध्या तरुणांचा कल निरोगी आणि स्लिम-फिट शरीर बनवण्याकडे आहे. अनेक जण व्हेजिटेरियन असल्याने ते आपल्या आहारात पनीर, हरभरे, मटकी, प्रोटीन शेक आदींचा समावेश करतात. मात्र आजकाल बाजारात भेसळयुक्त पनीर मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होण्याऐवजी हानी देखील होण्याच्या शक्यता आहे.

अनेक ठिकाणी विशेष सेलिब्रेशन असेल तर पनीरची भाजी आपल्याला हमखास पाहायला मिळते. पनीर हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि आपल्याला प्रोटीन आणि फॅट्स चा भरपूर पोषण देण्याचे काम पनीर करते. पनीरमध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणावर असते. तसेच पनीरमुळे आपल्या शरीरात गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्यास देखील मदत होते.

बनावट पनीर ओळखण्यासाठी आता आपण सावध झाले पाहिजे. जेव्हा पण तुम्ही बाजारात पनीर खरेदी करण्यास जाल तेव्हा प्रथम ते हाताने मळून तपासा. पनीर स्किम्ड मिल्क पावडरपासून बनते त्यामुळे ते तुमच्या हाताचा दबाव सहन करू शकत नाही. मळल्याने पनीरचे तुकडे होऊन ते विखरले जाते आणि जर त्याचे मळल्यावर तुकडे होत असतील तर समजून जा की पनीर बनावट आहे. अशा पनीरच्या सेवनामुळे आपल्याला नक्कीच हानी होऊ शकते.

बनावटी पनीर ओळखण्यासाठी तुम्ही आयोडीन टिंचरचा देखील वापर करू शकता. सर्वप्रथम बाजारातून आणलेले पनीर एका पॅकमध्ये घ्या आणि त्यात पाणी टाका. पाच मिनिट उकळल्यानंतर ते थंड करा आणि थंड झाल्यावर या पनीरमध्ये आयोडीन टिंचरची काही थेंब टाका. पनीरचा रंग जर निळा झाला तर समजून जा की तुमचे पनीर बनावटीचे आहे.

तुम्ही जेव्हापण बाजारातुन पनीर आणाल तेव्हा एक खात्री करा की पनीर रबरासारखे नसावे. अस्सल पनीर हे नरम असते हे कायम लक्षात ठेवावे. सोयाबीन किंवा तूरडाळीच्या पिठाच्या मदतीने देखील तुम्ही पनीर बनावटीचे आहे की नाही हे ओळखू शकता.

सर्वप्रथम पनीर पाण्यात टाकून थोडे उकळवा आणि थोडे थंड झाल्यानंतर त्यात सोयाबीन किंवा तूरडाळीचे पीठ टाकून १० मिनिटांसाठी ठेवा. जर १० मिनिटांनंतर पनीरचा रंग फिकट लाल होत असेल तर समजून जा की तुमचे पनीर बनावटी आहे. लाल रंग होण्याचे कारण म्हणजे बनावटी पनीर डिटर्जंट अथवा युरियाने बनवलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button