
कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्यामुळे मागील वर्षी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली नाही. आषाढी साजरी न करता आल्यामुळे वारकऱ्यांमध्ये पण दुःख होते. यावर्षी पण कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आषाढी वारी बंद करावी लागली.
कोरोनामुळे यावर्षी वारीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनामुळे यंदा १० पालख्यांना पंढरपूरला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर याला विरोध केला आहे. आता विश्व हिंदू परिषदेने पण मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे.
महाराष्ट्राच्या संत परंपरेवर पण मोठ्या प्रमाणावर अन्याय केला आहे. दोन महिन्यांपासून पायी वारी चालू करावी अशी मागणी वारकर्यांनी घातली होती. पण त्या मागणीला पण मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने पायी वारी चालू करावी अशी मागणी केली आहे.
सरकारने अशी वागणूक वारकर्यांना दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांना विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेण्याचा अधिकार नसल्याचे या वेळी शंकर गायकर यांनी म्हटले आहे. वारकर्यांनी आज पर्यंत सरकारला मदत केली आहे. मात्र सरकार दरवेळी वारकऱ्यांवर अन्याय करत असल्याचे पण यावेळी सांगण्यात आले आहे.
वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.