Breaking News
Home / नवीन खासरे / अनेक मिम मध्ये दिसणारा हा पाकिस्तानी क्रिकेट टीमचा चाहता आहे तरी कोण ?

अनेक मिम मध्ये दिसणारा हा पाकिस्तानी क्रिकेट टीमचा चाहता आहे तरी कोण ?

२०१९ मध्ये वर्ल्ड कप मध्ये हा फोटो (चेहरा) वायरल झाला आणि तेव्हापासून हा चेहरा सतत वेगवेगळ्या सोशल मिडिया वेबसाईटवर सतत वायरल होत आहे. मिम चाहत्यांना हा चेहरा आवडतो आणि परत परत कुठेना कुठे हा चेहरा दिसत असतो. परंतु हा व्यक्ती कोण आहे ? तो काय करतो याबाबत अनेकांना माहिती नाही आहे.

तर या व्यक्तीचे नाव आहे महम्मद सरीम अख्तर आणि हा फोटो २०१९ मध्ये आस्ट्रेलिया vs पाकिस्तान वर्ल्ड कपच्या सामन्या मधील आहे. पाकिस्तानने दिलेल्या खराब खेळीवर तो नाराज होता आणि यामध्ये कैमरामध्ये त्याचा चेहरा आला आणि सर्वत्र धुमाकूळ करत आहे. नेटीजन्स कोणाला प्रसिद्ध करायचे असेल तर कसलीच कसर सोडत नाही.

सरीम अख्तर लंडन मध्ये राहतो आणि त्याचा हा हावभाव पाकिस्तानी प्लेयरने एक सोपा झेल सोडल्यावर आला होता. हा मिम इतका वायरल गेला कि अनेक पाकिस्तानी क्रिकेट चाहते त्याचा चेहरा असलेली टी शर्ट घालू लागले. पाकिस्तान आणि न्युजीलंड सिरीज मध्ये अनेक लोक हि टी शर्ट घालून होते.

२०२० मध्ये झालेल्या इंग्लंड आणि पाकिस्तान सिरीज मध्ये सरीम अख्तरचा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने tweet केला ज्यामध्ये तो टीमला चांगले खेळण्याचा संदेश देत आहे. सरीम अख्तर हा लंडन मध्ये ९-५ नौकरी करणारा सामान्य युवक आहे तो ऑडीटर म्हणून काम करतो. आपल्या पत्नी आणि मुला सोबत तो लंडन मध्ये राहतो.

सरीमचे शिक्षण कराची येथे झाले काही काळ कुवैत मध्ये काम केल्यावर तो लंडन येथे सेटल झाला. मिम वायरल झाल्यानंतर त्याला कोका कोला कंपनीने जाहिरातीमध्ये काम दिले होते. तो भारतीय संघात धोनीचा चाहता आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *