Breaking News
Loading...
Home / बातम्या / पाकिस्तानात घर घ्यायचा विचार करताय? आपल्याला मिळू शकते पंतप्रधानांचे भाडेतत्वावर घर

पाकिस्तानात घर घ्यायचा विचार करताय? आपल्याला मिळू शकते पंतप्रधानांचे भाडेतत्वावर घर

भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. मात्र सध्या आणखी एक कारणाने पाकिस्तान चर्चेत आला आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक देशांना नुकसान भोगावे लागले आहे. पाकिस्तानला देखील मोठा फटका कोरोनाच्या संकटामुळे बसला आहे.

पाकिस्तानमध्ये इतकी आर्थिक चणचण भासत आहे की, पाकिस्तान सरकारने आता पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान रिअल इस्टेट क्षेत्रात भाड्याने देण्याची तयारी सुरु केली आहे. यापूर्वी सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने ऑगस्ट २०१९ मध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे रूपांतर विद्यापीठात करण्यात येईल अशी घोषणा केली होती.

Loading...

मात्र आता पाकिस्तनाला मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक माध्यमांच्या सूत्रांनुसार, इस्लामाबादच्या रेड झोन कॉम्पलेक्समध्ये असलेली मालमत्ता आता सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो, शैक्षणिक आणि इतर कार्यक्रमांसाठी भाड्याने दिली जाणार आहे. यातून केंद्रीय मंत्रिमंडळ पीएम हाऊसमधून महसूल गोळा करण्याच्या अधिक मार्गांचा विचार करणार आहे.

२०१९ मध्ये तत्कालीन शिक्षमंत्री शफफत मेहमूद यांनी सांगितले होते की पाकिस्तानच्या पंतप्रधान निवासस्थानाच्या देखभालीची किंमत जवळपास ४७० दशलक्ष रुपये इतकी आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी हा सरकारी बंगला रिकामा करण्याचा निर्णय घेतला होता आणि हे घर उच्चस्तरीय शैक्षणिक संस्थेत रूपांतरित करण्याचे आदेश दिले होते.

लोहारमधील गव्हर्नर हाऊसचे संग्रहालय आणि कलादालनात रूपांतर केले जाणार तर मुरी येथील पंजाब हाऊस एक पर्यटन परिसर म्हणून आणि कराची येथील गव्हर्नर हाऊस देखील संग्रहालय म्हणून वापरले जाणार आहे अशी माहिती महमूद यांनी दिली होती.

पाकिस्तानात अर्थव्यवस्था सध्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. थेट भांडवली गुंतवणुकीच्या अभावामुळं महागाई खूप वाढत आहे तसेच चालू आर्थिक वर्षात व्यापारी तूट मंदावली आहे. पाकिस्तनाला आता खाण्यासाठी देखील खूप जास्त पैसे मोजावे लागत आहे अशी परिस्तिथी असल्याने आता पाकिस्तान सरकारने पंतप्रधानांचे सरकारी घर भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *