Breaking News
Loading...
Home / बातम्या / पाचवी, आठवी, अकरावीच्या विध्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; शिष्यवृत्ती, सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर

पाचवी, आठवी, अकरावीच्या विध्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; शिष्यवृत्ती, सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा जाहीर करण्यात येते. मात्र कोरोनाच्या संकटकाळामुळे गेल्यावर्षीपासून शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी पुन्हा एकदा शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेमध्ये बदल केला आहे असे सांगितले आहे.

आता शिष्यवृत्ती परीक्षा ९ ऑगस्ट रोजी आयोजित केली जाणार आहे. ८ ऑगस्ट ला राज्यात केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा असल्या कारणाने शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेतली जाते. सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आता परीक्षा येत्या ८ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती ती आता ९ ऑगस्टला होणार आहे.

Loading...

सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे १० लाखांहून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करत असतात. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.

राज्यातील ४७ हजार ६१२ शाळांमधील ६ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी यावेळेस परीक्षेसाठी अर्ज भरला आहे. यामध्ये पाचवीच्या वर्गासाठी ३ लाख ८८ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. आठवीच्या वर्गासाठी २ लाख ४४ हजार १४३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे.

अकरावीच्या सीईटी परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी तोबा गर्दी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्याने पहिल्यांदा अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा ऐच्छिक स्वरूपाची असून यासाठी राज्य मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. सीईटी परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळातर्फे हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना अर्ज भरताना कोणतीही अडचण असल्यास ९६८९१९२८९९ व ८८८८३३९५३० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत घेतली जाणार आहे.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *