नवीन खासरेबातम्या

ऑलिम्पिक विजेते खेळाडू पदक का चावतात ? ‘हे’ आहे त्यामागील गमतीशीर कारण

खेळाडूंसाठी ऑलिम्पिक ही सर्वात मोठी स्पर्धा असते. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी खेळाडू जीवाचे रान करत असतात. कोणताही खेळाडू ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिकंण्याच्या तयारीने आणि ईर्ष्येने सहभागी होत असतो. ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी खेळाडूंना विविध अन्य स्पर्धांमधून सुरुवात करून पुढे देशाच्या ऑलिम्पिक टीममध्ये समाविष्ट केलं जातं. यासाठी विशिष्ट स्पर्धांमध्ये चमकदार कागिरी करावी लागते.

आतापर्यंत आपण अनेकदा पहिले असेल की सुवर्णपदक जिंकलेला खेळाडू ते पदक दातांनी चावत फोटोसाठी पोझ देत असतो. या क्षणाचे व्हिडीओ व्हायरल होतात आणि वर्तमानपत्रात देखील हे छापून येतं असतं. मात्र खेळाडू जिंकल्यानंतर पदक का चावतात हे आपल्यातील अनेकांना माहीतच नसतं. यामागे एक विशिष्ट परंपरा दडलेली आहे.

पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला सुवर्णपदक, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला रौप्यपदक तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला कांस्यपदक दिलं जातं. पूर्वीच्या काळी हे सुवर्णपदक पूर्णपणे शुद्ध सोन्याचा वापर करून तयार केलं जात असे. सोने हे इतर धातूंच्या तुलनेत अधिक नरम आणि लवचिक असतं. त्यामुळे जेव्हा पहिल्या क्रमांकाचे विजेते आपलं सोन्याचं पदक चावायचे, तेव्हा त्यांच्या दातांचे व्रण त्या पदावर उमटत.

आपल्या पदकावर आपली छाप उमटवण्यासाठीचा हा एक प्रकार होता. शिवाय असं काही केल्यामुळे आपल्याला मिळालेलं पदक हे खरचं सोन्याचं असल्याची खात्रीही त्यांना करता येत होती. पूर्वी जरी पदक चावण्यामागे काही कारण असलं, तरी आता मात्र केवळ छायाचित्रासाठी पोझ म्हणून खेळाडू पदक चावत असतात.

आताच्या सुवर्णपदकात मोठ्या प्रमाणावर चांदी आणि काही प्रमाणावर सोनं असतं. आताच्या काळात सुवर्णपदक पूर्णपणे शुद्ध सोन्यापासून बनवलं जात नाही. पुढच्या आठवड्यापासून सुरु होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणाऱ्या सुवर्णपदकात देखील केवळ सहा ग्रॅम सोनं असणार आहे. विशेष म्हणजे या पदकाचं वजन एकूण ५५० ग्रॅम आहे. म्हणजेच या सुवर्णपदकात ५५० ग्रॅम चांदीच असणार आहे.

कित्येक खेळाडू आजकाल रौप्यपदक देखील चावताना दिसत असतात. रौप्यपदक चावल्यास त्यावर दातांचे व्रण उमटत नाही मात्र तरीदेखील खेळाडू पदक चावताना दिसतात. कित्येक खेळाडूंना याबद्दल विचारल्यावर ते सांगतात की आम्हाला छायाचित्रकारच मेडल चावण्यासाठी सांगतात, जेणेकरून त्यांना चांगला फोटो मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button