Breaking News
Home / आरोग्य / रात्री लवकर झोप येत नसेल तर हे ७ उपाय करा, लगेच येईल ढाराढूर झोप!

रात्री लवकर झोप येत नसेल तर हे ७ उपाय करा, लगेच येईल ढाराढूर झोप!

आजकाल बदलत्या जीवनशैलीसोबत माणसाच्या सवयी देखील बदलल्या आहेत. माणसाला रात्री झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या हातात मोबाईल लागतो. मानसिक ताण देखील खूप वाढला आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर तर खूपच वाढला आहे. यामुळे निद्रानाशाची समस्या आपल्या आयुष्यात आली आहे.

कितीही धावपळ झाली, कितीही ताण असला तरी एवढं लक्षात ठेवा कि निरोगी राहण्यासाठी ७-८ तास झोप शरीराला खूप गरजेची आहे. व्यवस्थित झोप न झाल्यास अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या देखील झोपेचं खोबरं होत असेल तर हे उपाय नक्की करून बघा.

१. रात्री भरपूर खाणे टाळा- आहार हा झोपेमध्ये खूप महत्वाचा दुवा आहे. तुम्ही सकाळी पोटभर नास्ता करा, दुपारी पोटभर जेवण करा पण रात्री मात्र जास्त खाणे टाळा. सोबतच रात्रीचे जेवण अतिमसालेदार असणार नाही याची काळजी घ्या. कारण यामुळे तुम्हाला पित्त होऊन झोपेची वाट लागू शकते. झोपण्यापूर्वी २-३ तास आधी जेवण केलेले कधीही उत्तम.

२. दिवस झोप घेणे बंद करा- दुपारी झोपण्याची अनेकांना सवय असते. थोडीशी डुलकी घेऊया असे अनेक जण म्हणतात. पण याच दुपारच्या डुलकीमुळे रात्रीची झोप खराब होते. त्यामुळे डुलकी आधी बंद करा.

३. धूम्रपान व मद्यपान टाळा- झोपण्याच्या आधी जर मद्यपान केल्यास मस्त झोप लागते हा खूप गोड गैरसमज आहे. तुम्हाला झोप तर खूप येईल पण रात्री सारखी जाग देखील येईल. त्यामुळे मद्यपान तर टाळाच पण धूम्रपान देखील करू नका.

४. झोपण्याच्या आधी व्यायाम करणे टाळा- व्यायाम हा सकाळी करणे आरोग्यासाठी चांगले असते. पण आजकाल अनेकांना रात्री व्यायाम करण्याची सवय लागली आहे. कितीही बिझी शेड्युल असेल तर रात्री जिमला जाणे टाळा. कारण यामुळे तुमची झोप बिघडू शकते. कधीही झोपण्याच्या ४ तास आधी व्यायाम करा.

५. झोपण्यापूर्वी पाणी जास्त पिऊ नका- झोपण्यापूर्वी अनेकदा तहान लागते. तहान लागली जरी नाही तर सतत लागल्याची भावना होते. त्यामुळे आपण खूप जास्त पाणी पितो. पण जास्त पाणी पिल्यास तुम्हाला लघवीला सारखं उठाव लागू शकते. असे झाल्यास झोप मोड होईल.

६. चहा कॉफी पिणे टाळा- झोपण्यापूर्वी चहा कॉफी पिण्याची सवय देखील अनेकांना असते. पण यामुळे झोपेचा खराबा होतो. झोपेच्या कमीत कमी ४ तास आधी चहा कॉफी प्या.

७. झोपण्यापूर्वी जास्त विचार चिंता करू नका- झोपताना अनेकदा काही पण विचार डोक्यात येतात. अनेकदा माणूस चिंता देखील करत असतो. पण यामुळे फायदा तर काही नाही पण झोपेचा खराबा मात्र नक्की होतो.

६-९ वयोगटातील मुलांना ९-११ तास, १८ ते ६४ मधील प्रौढांसाठी ७-९ तास तर ६५ वर्षावरील वृद्धांसाठी ७-८ तास झोप गरजेची असते. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *