राजकिय

खळबळजनक बातमी; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्राच्या राजकारणात कायम एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यामुळे येथील राजकारणाचे स्वरूपाचं पूर्णतः बदलून गेल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. एका बाजूला त्यांच्या भाषणाची सुरुवात झालेली असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्याने सभेतील भाषण त्यांच्या अंगलट येणार असल्याची चर्चा होत आहे. त्यांनी सभेत तलवार दाखवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी मेणातून तलवार दाखवल्यामुळे राज ठाकरे यांच्यावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तलवार भेट देण्यात आली आहे.

त्यांना जेव्हा तलवार भेट मिळाली तेव्हा त्यांनी म्यानातून ती बाहेर काढल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांनी सत्कार केल्यानंतर त्यांना ही तलवार भेट मिळाली होती. राज्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असताना गुन्हा दाखल झाल्यामुळे सगळीकडचे वातावरण तापले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button