Breaking News
Home / बातम्या / नवजात बाळाला कोरोना झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी जे केलं ते खूपच संतापदायक आहे..

नवजात बाळाला कोरोना झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी जे केलं ते खूपच संतापदायक आहे..

सध्या जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनामुळे आजपर्यंत लाखो जणांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ चिंताजनक बनली आहे. कोरोनामुळे देशात देखील हाहा कार उडाला आहे. भारत कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत नुकताच ब्राझीलला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.

देशातील रुग्णसंख्या ४२ लाखांच्या पार गेली आहे. कोरोनामुळे अनेक माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या घटना घडल्या. पण माणुसकीला काळिमा फा सणाऱ्या घटनांची संख्याच कोरोनाच्या काळात जास्त आहे. अनेकांनी कोरोना झालेल्या आपल्या नातेवाईकांचे मृ तदेह स्वीकारण्यास देखील नकार दिला. अशा अनेक मन सुन्न करणाऱ्या घटना मागील ६ महिन्याच्या कालावधीत देशभरात घडल्या आहेत.

दरम्यान एक अशीच मन सुन्न करणारी घटना झारखंडमध्ये घडली आहे. झारखंडच्या रांचीमध्ये हि घटना समोर आली आहे. आपल्या नवजात बाळाला कोरोना झाल्याचं कळल्यानंतर त्याच्या जन्मदात्यानी त्याला रुग्णालयात सोडून पळ काढला आहे. हि धक्कादायक घटना मन हेलावणारी आहे. आपल्या १८ दिवसांच्या नवजात बाळाला कोरोनाची लागण झालेल्या बाळाला या आई बापाने रुग्णालयात सोडले आहे.

आई वडिलांनी पळ काढला असला तरी रुग्णालयाने त्या बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. झारखंडची राजधानी रांचीमधील रिम्स (RIMS) सुपर स्पेशालिटी विंगमध्ये दाखल केलेल्या एका १८ दिवसांच्या बाळाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्याचे कुटुंबीय त्याला रुग्णालयातच सोडून पळून गेले. चार दिवसांपूर्वी बाळाच्या आई-वडिलांना अनेकदा सांगूनही ते रुग्णालयात परत आले नाहीत. अशावेळी रिम्सच्या डॉक्टरांनी बाळाचा जीव वाचविण्याचे ठरवलं.

सोमवारी या नवजात बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. सध्या बाळाला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. बाळाच्या आतड्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर ४८ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. नवजात बाळाला रिम्समध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा शस्त्रक्रियेपूर्वी कोरोना चाचणी केली तेव्हा बाळ कोरोना पॉझिटिव्ह आलं.

या बाळाचे आईवडील हे विश्रामपूरमध्ये राहणारे आहेत. रुग्णालयाने जिल्हा प्रशासनाला याविषयी माहिती दिली आहे. आई वडिलांची माणुसकी संपली असली तरी या बाळाच्या आजी आजोबाना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली आहे. आता ते बाळाचा सांभाळ करत आहेत.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *